corona virus
corona virus 
जळगाव

जळगाव : कोरोना बाधितांचा पुन्हा द्विशतकी आकडा 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरच आहे. आज देखील जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा द्विशतकी आला असून नवीन 217 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 4 हजार 803 वर पोहचला आहे. यासोबतच आज देखील जिल्ह्यात अकरा जणांचा कोरोनामुळे 'मृत्यू झाला. 
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जळगावसह अमळनेर आणि भुसावळ पालिका परिसरात सात दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे कोरोनाची साखळी तोडणे शक्‍य असले तरी यापुर्वी एक'मेकांच्या संपर्कात आलेल्यांमुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढता आहे. जिल्ह्यातील एकूण 862 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 673 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 217 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा हा 4 हजार 803 वर पोहचला आहे. 

अकरा जणांचा मृत्‍यू 
कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. वयोवृद्ध किंवा प्रतिकार शक्‍ती कमी असलेल्यांना अधिक त्रास होवून त्यांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांपैकी 215 रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचा रिपोर्ट वैद्यकिय महाविद्यालयाने दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे अकरा जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 293 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात असे आढळले रूग्ण 
जळगाव शहर 92, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 6, अमळनेर 1, चोपडा 11, भडगाव 5, धरणगाव 2, यावल 6, एरंडोल 3, जामनेर 5, रावेर 15, पारोळा 26, चाळीसगाव 18, बोदवड 15, इतर जिल्हा 1. 

जळगाव शहरात 92 जण बाधित 
जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आज सर्वाधिक 92 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले. आज आढळून आलेले बहुतांश रूग्ण हे नवीन परिसरातील आहेत. यामुळे शहरातील एकूण बाधितांचा आकडा 1 हजार 95 वर पोहचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT