farmers oppose the bill
farmers oppose the bill 
जळगाव

ठाकरेंनी संकलीत केल्या अकरा हजार सह्या; शेतकरी विधेयकाला विरोध 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : केंद्रातील मोदी सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार विरोधी कायदा संमत करून देशातील शेती व शेतकरी यांना रस्त्यावर आणण्याचा जो घाट चालवला आहे; त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राबवलेल्या स्वाक्षरी अभियानाला जळगाव शहरातील विविध भागात प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पंचायतराजचे माजी जिल्हाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी केलेल्या ११ हजार १११ सह्यांचे संकलन फाईल प्रदेश काँग्रेसला रवाना करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा स्वाक्षरी अभियानाचे जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदिया यांना सुपूर्द करण्यात आले. 

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यभर केंद्राने पारित केलेले काळा कायदा असलेले कृषी विधेयक रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रपती यांना २ कोटी सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे.प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, स्वाक्षरी अभियानाचे जिल्ह्याचे निरीक्षक मुगदिया यांनी शहर काँग्रेसकडून प्रभागनिहाय स्वाक्षरी अभियानात ५० हजार सह्यांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश चिटणीस डी.जी.पाटील, युवक काँग्रेस एनएसयुआयचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अँड. अविनाश भालेराव, शहर काँग्रेसचे स्वाक्षरी मोहीम अभियानाचे कार्यक्रम प्रमुख प्रदीप पवार यांनी कार्यक्रमाचा सातत्याने आढावा घेऊन मार्गदर्शन केले. 

युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल बाहेती, शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शाम तायडे, नदीम काझी, विजय वाणी, अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोज सोनवणे, युवक काँग्रेसचे मुक्तदीर देशमुख, शहराध्यक्ष मुजीब पटेल, शहर सरचिटणीस परवेज पठाण, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अमजद पठाण, प्रदीप तायडे, जगदीश गाढे, ज्ञानेश्वर कोळी, जाकीर बागवान आदी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT