krushi kendra close
krushi kendra close 
जळगाव

शेतकऱ्यांनी आता जावे कोठे...कृषी केंद्र संचालकांचा बंद; सरकारच्या दडपशाहीला विरोध 

सुरेश महाजन,

जामनेर : बि- बियाणे आणि खते विक्रेत्यांविरोधात शासनाच्या कृषी विभागाकडून विना चौकशी सर्रासपणे गुन्हे दाखल करून नाहक त्रास देण्यात येत आहे. सरकारच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ तालुक्‍यातील कृषी केंद्र तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. याबाबत कृषी केंद्र संचालकांतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे. 

राज्यात सध्या सोयाबीन, मका आदी बियाण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर शासनाच्या कृषी विभागाकडून कोणतीही शहानिशा न करता कृषी केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या प्रकारात न्यायालयाने सुद्धा खातरजमा न करता गुन्हे दाखल करण्याचे फर्मावले आहे. आम्ही सीलबंद व शासनाची परवानगी असलेलाच माल खरेदी विक्री करीत असतो, मग यात आमचा काय दोष काय. अशा अनेक मुद्यांसंदर्भात राज्य संघटनेने शासन दरबारी आपले बद्दल चुकीचे अर्थ काढले जात असल्याने राज्य व्यापी बंदची हाक दिलेली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुकाभरातील सर्व कृषी केंद्र आजपासून जुलैपर्यंत तीन दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी यांना सुध्दा निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी अभय बोहरा, नंदू पाटील, विनोद चोरडिया, दीपक पाटील, अमित धारीवाल, मुकेश बोहरा आदींसह व्यापारी उपस्थित होते. 

पहूर येथे शंभर टक्के बंद 
पहूर येथे कृषी आयुक्तांच्या निषेधार्थ पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमध्ये आज पहूर येथील कृषी केंद्र संचालकांनी सहभाग नोंदवत शंभर टक्‍के बंद पाळला आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टीसाईड, सीड्‌स डीलर्स असोसिएशनच्या निर्णया नुसार पहूर येथील सर्व कृषी केंद्र बंद राहणार असल्याचे पहूर कृषी केंद्र संघटनेच्यावतीने माजी सभापती प्रदीप लोढा यांनी सांगितले आहे. दोन दिवस पाऊस झाल्याने शेतशिवारात कामांना गती मिळाली आहे. खते देण्याच्या ऐनवेळी कृषी केंद्र बंद असल्याने सामान्य शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. पैसे असूनही खते न मिळाल्याने शेतकरी हैराण होत आहेत.

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT