Relief and Rehabilitation Minister Anil Patil while batting at the inauguration of Namdar Cup. esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान देणार : मंत्री अनिल पाटील

शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला वैभवशाली परंपरा असून, यापुढे देखील ही उज्ज्वल परंपरा जपून मतदार संघाच्या क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान देणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले. अमळनेर क्रिकेट असोसिएशन आयोजित नामदार चषकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. (Minister Anil Patil statement Will contribute significantly to sports sector of Amalner jalgaon news)

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. १०) सकाळी दहाला मंत्री अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यात विजेत्या संघाला दोन लाख तर उपविजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे.

या वेळी व्यासपीठावर खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, संचालक योगेश मुंदडा, विनोद पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, प्राचार्य ए. बी. जैन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील.

काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, राजेश पाटील, संजय पाटील, प्रताप शिंपी, शिवाजी पाटील, प्रवीण जैन, ॲड. व्ही. आर. पाटील उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री अनिल पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या क्रिकेटवरील प्रेमाचा आवर्जून उल्लेख करीत अमळनेर संघात स्थान मिळाले नसल्याने ते चोपडा संघाकडून खेळत असल्याचे सांगितले.

अमळनेरमधून अनेक तरुण खेळाडू पुढे येत असून, फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा क्षेत्राला चालना देणार असून, तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटींचा निधी मिळाला आहे तर अजून ३ कोटींचा निधी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

पहिल्याच सामन्यात अमळनेरची बाजी

अमळनेर विरुद्ध संगमनेर या पहिल्या सामन्याची नाणेफेक मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करून स्पर्धेला सुरवात झाली. या सामन्यात अमळनेरच्या संघाने ६८ धावांनी संगमनेर संघाचा पराभव केला.

रविवारी (ता. ११) सकाळच्या सत्रात जैन इरिगेशन विरुद्ध दीपनगर (भुसावळ) तर दुपारच्या सत्रात अमरावती विरुद्ध के. बी. क्लब (अमळनेर) यांच्यात सामना रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT