Jalgaon Municipality News : उपायुक्तापासून थेट नगररचना,बांधकाम विभागावर संक्रांत

महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी मोठे प्रशासकीय फेरबदलाचे आदेश काढले.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon Municipality News : महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी मोठे प्रशासकीय फेरबदलाचे आदेश काढले. नगररचना सहाय्यक संचालकांकडे असलेले मंजुरीचे अधिकार काढून घेतले आहेत. तर दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त ते सहाय्यक आयुक्त यांच्याकडे असलेले सर्वच पदभार बदलण्याची धडक कारवाई केली आहे.

शनिवार (ता.९) पासूनच हे आदेश लागू झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. (Municipal Commissioner has taken away approval powers of Assistant Town Planning Director jalgaon news)

महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी प्रशासकीय अंर्तगत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. अचानक झालेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वात वादग्रस्त असलेल्या नगररचना विभागावरच कारवाईचा बडगा उगारला आहे.

अधिकार काढले

महापालिका नगररचना विभागातील सहाय्यक संचालक यांच्याकडे असलेले मंजुरीचे अधिकारी आयुक्तांनी स्वत:कडे घेतले आहेत. महापालिका हद्दीतील बांधकाम विकास योजना विषयक कामे,पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने नगररचना व सहाय्यक संचालक नगररचना विभाग यांना विविध चौरस मीटर बांधीव क्षेत्रास बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र इतर दाखले देण्याचे अधिकार होते. ते आदेश शनिवार (ता.९) पासून रद्द केले आहेत.

पदभारात बदल

आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त ते सहाय्यक आयुक्तांचे पदभार बदलताना त्यांनी काही विभागात सहाय्यक आयुक्तांना समन्वय अधिकारी अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त महसूल यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विभागाचे निर्णय सहाय्यक आयुक्तांनी घेतल्यास अंतिम आदेश अतिरिक्त आयुक्त व महसूल उपायुक्त देतील.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : चाळीसगावात गुंडांची काढली धिंड

अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे सामान्य प्रशासन,आस्थापना, शिक्षण , दवाखान , प्रमुख कार्यालय अंतर्गत, भांडार ,क्रिडा,विधी विभाग देण्यात आला आहेत. हेच विभाग सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर यांच्याकडेही देण्यात आले आहेत.

उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे स्वच्छता, मलेरिया,अग्निशमन, वाहन विभाग देण्यात आले आहेत. सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्याकडेही हेच विभाग आहेत. उपायुक्त गांगोडे यांच्या समन्वय अधिकारी असतील. महसूल उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्याकडे प्रभाग समिती १ ते ४ मार्केट वसुली, खुला भूखंड विभाग, घरकुल,एलबीटी, मिळकत व्यवस्थापन, महिला बालकल्याण, दिव्यांग, अतिक्रमण विभाग देण्यात आले आहे.

तर सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्याकडे हेच विभाग असणार आहेत. त्यांना समन्वयक निर्मला गायकवाड असतील.सहाय्यक आयुक्त अश्‍विनी गायकवाड यांच्याकडे बांधकाम, विद्युत,पाणी पुरवठा, प्रकल्प विभाग देण्यात आला आहे. त्यांना समन्वयक अधिकारी देण्यात आलेले नाहीत. त्यांना थेट आयुक्तांचा आपला अहवाल द्यावा लागणार आहे.

अभियंत्याचे विभाग बदली

नगरचना व बांधकाम विभागातील अभियंत्याचीही कार्यभार बदलण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पाटील यांच्या प्रभाग क्रमांक १५,१८,१९ चा पदभार होता.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Education News : विद्यार्थिनींना आता उच्च शिक्षणही पूर्णपणे मोफत : मंत्री चंद्रकांत पाटील

आता त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा प्रकल्प व पर्यावरण विभाग देण्यात आला आहे. तर कनिष्ठ अभियंता विशाल सुर्वे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रभाग क्रमांक १५,१८ व १९ चा कार्यभार देण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नरेंद्र जावळे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ९,१०,११ चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार होता.

तो काढून घेण्यात आला असून त्यांना शहर अभियंता यांचे सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शहर अभियंता सूचनेनुसार कामांची व तक्रारीची पाहणी करून अहवाल द्यावा लागणार आहे.

तर प्रभाग क्रमांक ९,१०,११चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार कनिष्ठ अभियंता किरण बळिराम देवरे यांच्याकडे देण्यात आला आहे. आरेखक अतुल पाटील यांच्याकडे नगररचनेत टीपीएस व डीपी तयार करण्याचे अधिकार होते,ते काढून घेण्यात आले असून त्यांना अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुखपद देण्यात आले आहे.

तर नगररचनेत टीपीएस व डीपी तयार करण्याचे अधिकारी रचना सहाय्यक घृष्णेश्‍वर सांळुखे यांच्याकडे देण्यात आले आहे

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : फुले मार्केट की ‘अतिक्रमणाचे बेट’; अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी दुकानदारांवरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com