Viral sunil esakal
जळगाव

14 वर्षांपासून बेपत्ता सुनील सोशल मीडियामुळे पोहचला घरी!

सुनील भोई नामक युवक १४ वर्षांपासून बेपत्ता झालेला होता.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : येथील बाहेरपूरा भागातील सुनील भोई नामक युवक १४ वर्षांपासून बेपत्ता झालेला होता. सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेला फोटो व माहितीच्या आधारे तो तमिळनाडूत असल्याचे कळाल्याने भोई कुटुंबीयांनी त्यास तमिळनाडूहून पाचोऱ्यात आणले व त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली.

सहज विचारपूस केली अन् सुनील घरी आला

सुनीलच्या परत येण्यामुळे भोई कुटुंबीयांत आनंदी आनंद आहे. सुनील भोई १४ वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यानच्या काळातील कोरोना (Corona) महामारीमुळे सुनील पुन्हा दिसणार नाही, असा समज भोई कुटुंबीयांचा झाला होता. सुनील भोई हा तमिळनाडूतील एका खेडेगावात जीवन जगत होता. एका युवकाने सहज म्हणून त्याची विचारपूस केली व मुलाखतीचा व्हिडिओ करून तो त्याने व्हाट्सअपवर (Whatsapp) व्हायरल केला. हा व्हायरल मेसेज पाचोरा येथे येऊन धडकल्यानंतर तो सुनील भोई असल्याचे स्पष्ट झाले. आनंदी झालेले भोई कुटुंबीय मिळालेल्या मेसेजच्या आधारे तमिळनाडूत धडकले व त्यांनी सुनीलला सोबत घेऊन तमिळनाडूहून मुंबई येथे विमानाने व मुंबईहून पाचोरा येथे रेल्वेने प्रवास करत परत आणले.

वाजत गाजत मिरवणूक

रेल्वे स्थानकावरून सुनीलची घोड्यावर बसवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घरी आल्यावर सुनील भाई यांचे औक्षण करत भोई कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला. १४ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला सुनील परत कुटुंबात येईल, असे भोई कुटुंबीयांना कदापी वाटले नसावे. सुनीलच्या येण्याने भोई कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचा आनंद कमालीचा वृद्धिंगत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT