Sat, June 3, 2023

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
Published on : 16 May 2022, 2:07 pm
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. निखील भामरे या नावाच्या अकाऊंट धारकावर हा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आशिष सुभाष बंसल (रा. मेन बाजार, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. भामरे याने शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट केली असून यामध्ये बदनामीकारक, मानहानीकारक व जिवे मारण्याच्या धमकीचा मजकूर आहे. यातून राजकीय पक्षामध्ये द्वेषाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केल्याने भामरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.