
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ या घटनेचे सत्य असल्याचे पोलिसांचे स्पष्ट केल आहे.
Viral Video: महिला वकिलला लाथा-बुक्क्यांनी जबरी मारहाण
कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका महिला वकिलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्या संबंधित महिला वकीलला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. तिला वाचवण्यासाठी कोणीही मदत करण्यास येत नसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. महिला वकिलला एक व्यक्ती बेदम मारहाण करत असताना तिथे असलेले नागरिक पाहत उभारले असल्याने सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, संगीता शिकेरी असे या महिला वकिलाचे नाव असून त्या हल्लेखोराचे नाव महांतेश असे आहे. मालमत्तेवरून या दोघांमध्ये वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित महिला वकिलाने त्या भागांतील भाजपचे सरचिटणीस राजू नाईकर यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याची बातमी समजताच महांतेश खवळला आणि त्याने महिला वकिलला मारहाण केली.
सध्या या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. या हाणामारीत महिला जखमी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या महिला वकिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेकडून तक्रार नोंदवून घेतल्यानंतर महांतेश कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ या घटनेचे सत्य असल्याचे पोलिसांचे स्पष्ट केल आहे.
हेही वाचा: आसाममध्ये पावसाळ्यापूर्वी पूर; सुमारे 57 हजार नागरिकांना फटका
दरम्यान, मला कोणीही हल्ला करण्यासाठी सांगितले नसल्याते महांतेशने सांगितले आहे. भाजप नेते राजू यांनीही महिलेचा आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून विनाकारण बदनामी केली जात असल्याचे स्पष्ट केलं आहे. हे राजकीय षडयंत्र असल्याचंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: 'उतराला लागलेली गाडी आणि...' फडणवीसांची सभा संपताच राऊतांचं ट्वीट
या घटनेवरून सोशल मीडियावर गदारोळ निर्माण झाला आहे. एका महिलेला मारहाण केली जात असून लोक प्रेक्षक बनले आहेत. अशी मारहाण करणाऱ्याला शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.
Web Title: Viral Video Karnataka Women Lawyer Thrashed Openly With Kicks And Punches In Bagalkot
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..