जळगाव : शहर महापालिकेत गठीत करण्यात येणाऱ्या विविध ११ समित्यांच्या सदस्य निवडीसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, भाजप गटनेते भगत बालाणी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, ‘एमआयएम’चे गटनेते रियाज बागवान, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. प्रत्येक समितीत सात सदस्य असतील. त्यात पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या पाच, तर शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश करता येणार आहे. सदस्य संख्येनुसार ‘एमआयएम’चे सदस्य कमी असल्याने त्यांच्या सदस्याचा समितीत समावेश करता येणार नाही.
आवर्जून वाचा- जिल्ह्याला जलसंपदा मंत्री लाभल्यानंतरही प्रकल्प राहिले अपुर्ण; खडसेंचा महाजनांवर निशाणा
या समित्या होतील गठीत
बांधकाम समिती, अतिक्रमण समिती, स्वच्छता समिती, पाणीपुरवठा समिती, दवाखाना समिती, नियोजन समिती, आस्थापना समिती, विधी समिती, वाहन व्यवस्था समिती, शिक्षण समिती, वीज समितीसाठी सदस्य निवड होईल. गटनेत्यांनी आपापल्या पक्षाच्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महासभेत महापौरांकडे द्यायची असून, त्यानंतर महासभेत समित्यांना मान्यता दिली जाणार आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.