Jalgaon crime News  esakal
जळगाव

Jalgaon : महावितरणच्या डीपीतून हजारोंचा ऑइल चोरीला

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील बिलाखेड गावातील महावितरण (MSEDCL) कंपनीच्या डीपीतून अज्ञाताने एकूण ४५ हजार रुपये किमतीच्या ऑईलची (Oil) चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहायक अभियंताच्या तक्रारीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (oil worth Thousands stolen from MSEDCL DP jalgaon news)

याबाबत सविस्तर वृत्त, तालुक्यातील बिलाखेड गावातील ११ केवी शेती पंपाचा वीजपुरवठा हा १८ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक बंद पडला. त्यावर येथील स्थानिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून वीजपुरवठा खंडित असल्याबाबत सांगितले. महेंद्र कैलास पाटील यांच्या तक्रारींवरून महावितरण कंपनीचे कर्मचारी सोमवार, २० रोजी सदर गावात गेले. त्यावेळी रोहित्रातील ४५ हजार रुपये किमतीचा एकूण ४५६ लिटर ऑइल अज्ञाताने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली असून सदर घटना हि शनिवार, १८ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून तर रविवार, १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेप्रकरणी सहायक अभियंता संजय मोहन सरताळे (वय-४५) रा. फुले कॉलनी, चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT