Jalgaon : खापरखेडा शिवारात बिबट्याचा वावर

leopards footprint
leopards footprintesakal
Updated on: 

पातोंडा (जि. जळगाव) : खापरखेडा (ता. अमळनेर) शिवारात शेतकऱ्याला सोमवारी (ता. २०) दुपारी बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले. घाबरलेल्या शेतकऱ्याने याबाबत ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर वन विभागाला (Forest department) कळविण्यात आले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ येऊन त्या भागात बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बिबट्यापासून संभाव्य धोका लक्षात घेता, त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (Leopards in Khaparkheda Shivara jalgaon news)

येथील शेतकरी प्रमोद पाटील व त्यांच्या पत्नी दुपारी दीडच्या सुमारास शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी जात असताना, त्यांच्यासमोरच रस्त्यालगतच्या शेतातून बिबट्या अचानक आला व काही क्षणातच त्याने उसाच्या शेतात शिरला. त्यामुळे पती-पत्नीची भंबेरीच उडाली. दोघांनी माघारी फिरत गावात येऊन बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. येथील वन परीक्षेत्र अधिकारी श्‍यामकांत देसले यांना कळववियानंतर त्यांच्यासह वन परिमंडळ अधिकारी पी. जे. सोनवणे, वनरक्षक आर. बी. भदाणे, आर. एस. वेलसे, श्रीमती देवरे, सूर्यवंशी, कुंभारे, पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. बिबट्याच्या पायांचे ठसे दिसून आले. हे ठसे बिबट्याचेच असल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या मार्गाने पाहणी केली असता, बिबट्या तापी नदीच्या दिशेने गेल्याचे दिसून आले.

वन विभागाचे आवाहन

पाहणी केल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात येऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. बिबट्या आढळून आल्यामुळे घाबरून न जाता, सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेषतः गंगापुरी, नालखेडा, मठगव्हाण व नदीकाठांवरील गावांनी याबाबत काळजी घ्यावी. शेतात जाताना एकटे न जाता, दोन- चार जणांनी एकत्र जावे, लहान मुलांना शेतात नेणे टाळावे, असे त्यांनी सांगितले.

शिकारीवर हल्ला झाल्याची चर्चा

या भागात रानडुकरांची संख्या अधिक असल्याने त्यांची शिकार करणारे चांगलेच सक्रिय झाले आहेत. खापरखेडा शिवारात रानडुकरांची शिकार करण्यासाठी बाहेरचे काही जण येतात. दोन दिवसांपूर्वी शेत शिवारात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची गावात जोरदार चर्चा आहे. त्यादृष्टीने वन विभागाने जवळपासच्या भागात जखमीचा शोध घेतला असता, याबाबत कोणालाही कुठलीही ठोस माहिती नसल्याने तो मिळून आला नाही. दरम्यान, बिबट्यासह रानडुकरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

leopards footprint
Nashik : इ-चलन केले म्हणून पोलिसावर रॉडने हल्ला

"ज्या ठिकाणी शेतकरी दांपत्याला बिबट्या दिसून आला होता, त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली असता, बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. काळजी घेण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांना योग्य त्या सूचना केल्या असून, याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे."

-श्‍यामकांत देसले, वनपरीक्षेत्र अधिकारी

leopards footprint
सेना, कॉंग्रेस आमदारांच्या बैठक; भाजप सरकार लवकरच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com