Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : अभय शास्ती योजनेतून 2 दिवसांत कोटीची वसुली; घरपट्टी थकबाकीदारांना सवलत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून घरपट्टीची थकबाकी असणाऱ्यांना अंतीम लिलाव नोटीस बजावण्यात आली आहे.

२२ डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्या अगोदर त्यांना ‘अभय शास्ती’ योजना लागू केली आहे. या अंतर्गत दोन दिवसात तब्बल एक कोटीची थकबाकी वसुली झाली आहे.(Recovery of crores in 2 days from Abhay Shakti Yojana jalgaon municipality news)

महानगरपालिकेने थकीत मालमत्ताकर धारकांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव घोषित केल्यापासून थकीतकर धारकांमध्ये घबराट पसरली आहे. संपूर्ण मालमत्ताकर भरण्यास तयार आहोत. परंतु आम्हांला शास्ती माफी करून एक संधी द्यावी अशी मागणी अनेक थकीत मालमत्ताकरधारकांनी महापालिकेला केली होती.

अनेक नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांना प्रत्यक्ष भेटून शास्तीमाफी योजना राबवावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. आमदार यांनी मालमत्तांच्या लिलाव करण्यापूर्वी एक संधी म्हणून अभय शास्ती योजना राबविण्याची विनंती पत्राद्वारे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली.

सर्व बाबींचा विचार करून महापालिकेने ४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत शंभर टक्के शास्ती माफीची योजना घोषित केलेली आहे. योजनेस पहिल्या दोन दिवसांत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यात दोन दिवसात तब्बल एक कोटी रुपये भरणा झालेला आहे. यात अकरा लाख रुपये ऑनलाइन भरणा झाला आहे.

कर भरण्यासाठी नागरिक प्रभाग समितीत गर्दी करत आहेत. यात थकीत मालमत्ताधारकांना ३० ते ६० टक्के रक्कम पर्यंतचा फायदा होत आहे. ही योजना फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे. सर्व थकीत कर मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा २२ डिसेंबरला अधिपत्र बजावलेल्या मालमत्तांच्या लिलाव केला जाणार आहे.

अभय शास्ती योजनेच्या कालावधीत शनिवार, रविवारीही प्रभाग समिती कार्यालय सुरू राहणार असून भरणा स्वीकारला जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जळगाव महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT