Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या मक्तेदारांवर आयुक्तांची कृपादृष्टी; काम न करण्यासही मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील रस्त्याची कामे सुरू आहेत, काही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, तर काही कामे महापालिकेतर्फे सुरू आहेत. महापालिकेतर्फे सुरू असलेली रस्ते व गटारीची कामे करणाऱ्या काही मक्तेदारांवर महापालिका आयुक्तांची कृपादृष्टी दिसून येत आहे.

काही ठिकाणी डांबर प्लँट सुरू नाहीत. त्यामुळे मक्तेदांरानी चार ते पाच महिन्यांपासून कामे थांबविली आहेत.(Sanctioned not to work on municipal corporation to monopolies jalgaon news)

शहरातील रस्ते खराब झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्त्याच्या कामासाठी शासनाने तसेच महापालिकेनेही निधी मंजूर केला आहे. कोटीच्या कोटी निधीतून कामे करण्यात येत आहेत. महापालिका निधीतून शहरातील रस्ते, गटारी तसेच इतर कामेही करण्यात येत आहेत. अनेक भागांत मक्तेदारांतर्फे रस्त्यांची कामे सुरू आहेत.

मात्र ती अद्यापही अपूर्णच आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यावर कामाचा एक लेअर टाकण्यात आला असून, पुढचे कामच झालेले नाही. गटार कामाचीही अवस्था अशीच आहे. विशेष म्हणजे एकाच मक्तेदाराकडे दोन ते तीन कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे मक्तेदार एका साइडचे काम अर्धवट ठेवून तेच कामगार दुसऱ्या साइटवर नेऊन काम करीत आहे. पुन्हा ते काम अर्धवट ठेवून तिसऱ्या साइटचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कामे अपूर्ण आहेत.

डांबर प्लँट सुरू नसल्याची कारणे

काही मक्तेदारांनी कामे सुरू केली आहेत. डांबराचा एक थर दिला आहे. परंतु दुसरा थर चार महिन्यांपासून दिलेला नाही. शिवाजीनगर भागात ही स्थिती आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधला असता संबंधित मक्तेदारांचा डांबरीकरणाचा प्लँट सुरू झाल्यानंतर काम सुरू होईल, असे सागंण्यात आले. दिवाळीनंतरही या मक्तेदाराचा प्लँट सुरू झालेला नाही? विशेष म्हणजे याच मक्तेदाराचे दुसरीकडेही काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अशीच स्थिती गटारीच्या काही कामांची आहे. ती कामेही अद्याप अपूर्णच आहेत.

आयुक्तांची कृपादृष्टी का?

महापालिकेकडून मक्ता घेतल्यानंतर सर्व अटी-शर्तींची पूर्तता करून घेण्यात येते. मात्र कामास विलंब झाला तरीही मक्तेदारावर कारवाई होत नाही, अशा मक्तेदारांवर आयुक्तांची कृपादृष्टी का आहे? यबाबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्तांनी याबाबत त्वरित माहिती घेऊन संबंधित मक्तेदारांना ताकीद देऊन कामे सुरू करून घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT