sand truck was caught by police on Bambhori bridge jalgaon  crime
जळगाव

Jalgaon Crime News : बांभोरी पुलावर पोलिसांनी पकडला वाळूचा ट्रक

धरणगाव तालुक्यातील बांभोरी पुलाजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धरणगाव पोलिसांनी कारवाई करत वाहन मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : धरणगाव तालुक्यातील बांभोरी पुलाजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धरणगाव पोलिसांनी कारवाई करत वाहन मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जप्त केले. (sand truck was caught by police on Bambhori bridge jalgaon crime news)

या प्रकरणी ट्रकचालक आणि मालक यांच्या विरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांभोरी गावातून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने मंगळवार (ता.१९) रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कारवाई करत विना नंबरचे वाळूने भरलेला ट्रक पकडला. चालक पवन राजेंद्र ठाकरे (वय ३२ रा. आहुजानगर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी वाळूने भरलेला ट्रक जप्त केला.

याप्रकरणी पोलिस नाईक पंकज शिंदे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक पंकज ठाकरे आणि मालक राजेंद्र कावळे (रा. जळगाव) या दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक विजय चौधरी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT