Upper Superintendent of Police Ramesh Chopde speaking at a meeting of office bearers of Durga Utsav Mandal. Police inspector Uddhav Dhamale on the dais.
Upper Superintendent of Police Ramesh Chopde speaking at a meeting of office bearers of Durga Utsav Mandal. Police inspector Uddhav Dhamale on the dais. esakal
जळगाव

Jalgaon News : ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करा : अप्पर पोलिस अधीक्षक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सण, उत्सवाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले.

धरणगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आयोजित दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले उपस्थित होते.(statement of Upper Superintendent of Police Strictly follow rules regarding noise pollution jalgaon news )

यंदा तालुक्यात ११२ दुर्गा मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शहरात झाली. यावेळी बोलताना श्री. चोपडे म्हणाले, की सण, उत्सव एकत्रितपणे सामंजस्याने साजरे करावेत. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारचे कोणतेही कार्य कोणाकडूनही होऊ नये.

जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असते. दुर्गा उत्सवात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश वजा सूचना देण्यात आल्या. तसेच वहन किंवा विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा, अन्य कुणाचाही अवमान होईल, असे कुठलेही कृत्य करू नये.

त्याचप्रमाणे स्थापन केलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना होणार नाही, याची देखील खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाहन मिरवणूक किंवा विसर्जन मिरवणुकीत पोलिस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे संबंधित लेझीम मंडळ तसेच विसर्जन मिरवणुकीतील भक्तांनी पालन करणे आवश्यक असल्याबाबत आदेश दिले.

यावेळी पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला तालुक्यातील दुर्गा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, श्‍याम मोरे, वैभव बाविस्कर यांच्यासह पोलिस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे पदाधिकारी प्रयत्नशील होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT