To get back advance employee of company was threatened and kept in hotel Jalgaon Crime News  
जळगाव

Jalgaon Crime News: ॲडव्हान्स परत मिळण्यासाठी डांबले कंपनीच्या कर्मचाऱ्याला; हॉटेलमध्ये 7 दिवस ‘टॉर्चर’

ठाणे येथील रहिवासी प्रसाद वसंत लिंगे (वय ५२ रा. हायलँड गार्डन, ढोकाळी, ठाणे) हे एका खासगी कंपनीत काम करतात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पेव्हर ब्लॉक आणि क्राँक्रीट प्रकल्प यंत्रासाठी कंपनीला दिलेली ‘ॲडव्हान्स’ रक्कम परत द्यावी, यासाठी ठाणे येथील कंपनीच्या कर्मचाऱ्याला धमकावून हॉटेलमध्ये डांबून ठेवले.

हे हॉटेल माजी महापौरांचे असून याठिकाणी सात दिवस ‘टॉर्चर’ करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (To get back advance employee of company was threatened and kept in hotel Jalgaon Crime News)

ठाणे येथील रहिवासी प्रसाद वसंत लिंगे (वय ५२ रा. हायलँड गार्डन, ढोकाळी, ठाणे) हे एका खासगी कंपनीत काम करतात. कंपनीने तयार केलेली यंत्रसामुग्रीबाबत व्यवहार ते पाहतात.

जळगाव येथे ‘बुक’ झालेल्या ‘ऑर्डर’साठी ते २८ नोव्हेंबरला जळगावमध्ये आले होते. जळगावमधील ठेकेदारांकडून ‘बुक’ झालेल्या दोन यंत्रांचे व्यवहार त्यांना पूर्ण करायचे होते.

त्यावेळी संशयित रवींद्र माळी आणि राहुल सोनवणे (दोघेही, रा.जळगाव) यांनी श्री. लिंगे यांना रेल्वेस्थानक भागातील एका हॉटेलमध्ये नेले. इथे पूर्वीपासून ‘बुक’ असलेल्या खोलीमध्ये श्री. लिंगे यांना सात आठ दिवस डांबून ठेवत दिलेली ‘ॲडव्हान्स’ रक्कम परत करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

दोघांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर मंगळवारी (ता. २६) त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवींद्र आणि राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक उपनिरीक्षक संजय बडगुजर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT