Bhusawal Central Railway: 6 मार्गांवर रेल्वे धावू लागल्या तासाला 130 किलोमीटर वेगाने; मध्य रेल्वे ‘मिशन मोड’वर

धावत्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्‍चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवास सोई मिळाव्यात म्हणून ‘ट्रॅक’चा दर्जा उत्तम राखला जात आहे.
Trains started running on 6 lines at speed of 130 km per hour jalgaon news
Trains started running on 6 lines at speed of 130 km per hour jalgaon news

Bhusawal Central Railway : मध्य रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. विविध विभागांमध्ये प्रवाशांना पायाभूत चांगली सेवा देण्यासाठी सुविधांची कामे केली जात आहेत. त्यामध्ये ‘मल्टीट्रॅकिंग’ (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ‘ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन’, ‘सिग्नलिंग’ आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे.

या कामांमुळे पुणे-दौंड विभाग, इटारसी-नागपूर-वर्धा- बल्हारशाह विभाग, वर्धा-बडनेरा विभाग, इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा विभाग या विभागात रेल्वे ताशी १३० किलोमीटरच्या वेगाने धावू लागल्या आहेत. त्यातून प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. (Trains started running on 6 lines at speed of 130 km per hour jalgaon news)

धावत्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्‍चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवास सोई मिळाव्यात म्हणून ‘ट्रॅक’चा दर्जा उत्तम राखला जात आहे. ‘ट्रॅक’चे आयुष्यमान कमी झाले, की लगेच ते बदलण्याचे काम हाती घेतले जात आहे. मध्य रेल्वे ‘ट्रॅक’ची देखभाल आणि नूतनीकरणाच्या कामात अपेक्षापेक्षा पुढे आहे. या कामांमुळे मध्य रेल्वेला या विभागात ताशी १३० किलोमीटर वेगाने गाड्या चालविता आल्या आहेत.

पुणे-दौंड विभाग (अंतर-७५.५९ किलोमीटर), इटारसी-नागपूर-वर्धा-बल्हारशाह विभाग (अंतर-५०९.०५ किलोमीटर), वर्धा-बडनेरा विभाग (अंतर-९५.४४ किलोमीटर), इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा विभाग (अंतर-५२६.६५ किलोमीटर) असे एकूण एक हजार २०६.७३ किलोमीटर अंतरात ताशी १३० किलोमीटरच्या वेगाने रेल्वेगाड्या धावत आहेत.

Trains started running on 6 lines at speed of 130 km per hour jalgaon news
Bhusawal Central Railway : तिकीट न विकता भुसावळ रेल्वेला 60 कोटींचे उत्पन्न

याच वेगाचे नियोजन

तासाला १३० किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या चालविण्याचे नियोजन आहे. त्यात दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी विभाग (अंतर-३३७.४४ किलोमीटर) चा समावेश आहे. १७ किलोमीटरच्या पुणतांबा-शिर्डी विभागात तासाला ७५ किलोमीटरवरून ११०, तर ९ किलोमीटरच्या बडनेरा-अमरावती सेक्शनमध्ये ६५ किलोमीटर तासावरून ९० किलोमीटर तास असा वेग वाढविण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरी विभागाची योजना

मुंबई उपनगरी विभागात रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्याची योजना आहे. टिळकनगर-पनवेल विभाग ३३ किलोमीटर, ठाणे-वाशी विभाग १८ किलोमीटर आणि नेरुळ-खारकोपर विभाग ९ किलोमीटर तासाला ८० किलोमीटर ते १०५ किलोमीटर, कर्जत-खोपोली विभाग ताशी ६० किलोमीटर ते ९० किलोमीटर. ‘ट्रॅक’ भूमिती सुधारून कायमस्वरूपी वेग निर्बंध (पीएसआर) हटविल्याने मध्य रेल्वेवरील गाड्यांच्या वेगात वाढ झाली आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर या गाड्यांचा वेग वाढविण्यात आला आहे.

Trains started running on 6 lines at speed of 130 km per hour jalgaon news
Bhusawal Central Railway: ‘नॉन इंटरलॉकिंग'च्या कामासाठी रेल्वे गाड्यांच्या मार्गामध्ये बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com