accident news esakal
जळगाव

Jalgaon News : सिमेंटच्या रस्त्यावर दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू

३० वर्षीय गृहिणी दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना सायंकाळी साडेसातला नशिराबाद गावात घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बेलव्हाय (ता. भुसावळ) येथील ३० वर्षीय गृहिणी दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना सायंकाळी साडेसातला नशिराबाद गावात घडली.

नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. शिल्पा उमाकांत खाचणे (वय ३०, रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) असे मृत गृहिणीचे नाव आहे.(Woman dies after bike slip on cement road jalgaon news)

कुटुंबीयांकडून प्राप्त माहितीनुसार, शिल्पा खाचणे पती उमाकांत मोतीराम खाचणे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय वास्तव्याला होत्या. जळगाव एमआयडीसीतील कंपनीत दोघे पती-पत्नी काम करून उदरनिर्वाह करत. शिल्पा यांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे दोघे जण नशिराबाद गावातील मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी आले होते.

मोबाईलचे काम आटोपून दोघेही पुन्हा बेलव्हाय जाण्यासाठी ७.३० वाजता दुचाकीने निघाले. सिमेंट रस्त्याला लागून असलेल्या फटमध्ये दुचाकीचे पुढील चाक येऊन चालक उमाकांत यांचा वाहनावरील ताबा सुटून शिल्पा खाचणे या जमिनीवर पडल्या.

त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पती उमाकांत खाचणे आणि दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री शहरातील मोकळ्या जागा, क्रीडांगणे आणि मनोरंजनासाठीची मैदाने आमदारांना आणि बिल्डर मित्रांच्या हवाली करत आहेत - आदित्य ठाकरे

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

Mumbai News: सी लिंकला 'तारीख पे तारीख'! 'वांद्रे-वर्सोवा'साठी चार टप्प्यांत १,४२१ दिवसांची मुदतवाढ

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

SCROLL FOR NEXT