ZP Of Jalgaon
ZP Of Jalgaon esakal
जळगाव

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेवर 74 हरकती

देविदास वाणी

जळगाव : येथील जिल्हा परिषद (ZP) व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे. त्या प्रभागरचनेवर अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ७४ हरकती घेण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ७७ गट व १५४ गणाची प्रारूप प्रभागरचना २ जूनला जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ९ गट व १८ गण असून, सर्वांत कमी २ गट व ४ गण बोदवड तालुक्यात आहेत. प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट ग्रामपंचायती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. बुधवार (ता. ८)पर्यंत एकूण ७४ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

बुधवारी दाखल झालेल्या हरकती

शेवटच्या दिवशी ३७ हरकती प्राप्त झाल्या. त्यात रावेर- ३, अमळनेर- १, धरणगाव -२, जामनेर- ६, जळगाव- ७, पाचोरा- ४, यावल- ५, चाळीसगाव- ५, भुसावळ- १, बोदवड १, मुक्ताईनगर १, अशा एकूण ३७ हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT