जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेवर 25 हरकती

election
electionesakal

जळगाव : येथील जिल्हा परिषद (ZP) व त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्या प्रभाग रचनेवर (Ward Formation) आतापर्यंत एकूण २५ हरकती घेण्यात आल्या आहेत. बुधवारी (ता. ८) हरकती घेण्याचा अखेरचा दिवस आहे. (Zilla Parishad Panchayat Samiti 25 objections on ward formation Jalgaon News)

जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ७७ गट व १५४ गणाची प्रारूप प्रभाग रचना २ जूनला जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ९ गट व १८ गण असून सर्वात कमी २ गट व ४ गण बोदवड तालुक्यात आहेत. प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट ग्रामपंचायती निश्चीत करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. आजअखेरपर्यंत एकूण २५ हरकती असून सर्वाधिक हरकती चाळीसगाव तालुक्यातील आहेत. नागरिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेत स्वीकारण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी सांगितले.

election
बेपत्ता रोहितचा खून झाल्याचा संशय; पोलिसांना सापडला होता सांगाडा

तालुकानिहाय हरकती अशा
तालुका---हरकती
रावेर--१
अमळनेर-१
धरणगाव --१
जामनेर--५
जळगाव--१
पाचोरा--२
यावल--२
चाळीसगाव--१०
पारोळा--१
चोपडा--१
एकूण--२५

election
जळगाव : मागील भांडण उकरून एकाला बेदम मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com