Businessman
Businessman 
काही सुखद

कचरा वेचून बनल्या उद्योजिका!

रिमा सुरडकर

औरंगाबाद - शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्‍वच वेगळे असते. दोन  वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्‍यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा तब्बल चार हजार कचरावेचकांना एकत्रित आणण्याचे काम स्वतः कचरावेचक असणाऱ्या आशाताई डोके यांनी केले आहे. 

आशाताई शिक्षित नसल्यामुळे त्यांनी मातीकामही केले. त्यातून पुरेशी आवक नव्हती. मुलांचे शिक्षण, घरचा खर्च भागत नसे. त्यामुळे त्यांनी कचरा वेचणे सुरू केले. याबरोबर त्यांनी वर्ष २००७ मध्ये कागद, काचपत्र, कामगार संघटना तयार केली. आज संघटनेत चार हजार सदस्य आहेत. कचरा गोळा करणे, कुंडीतील काचा, पत्रे, सुया अन्य पदार्थांमुळे त्यांचे आरोग्यही धोक्‍यात येत होते.

एवढे करूनही कचऱ्याचा दर्जा चांगला नाही असे म्हणत भंगारवाला चांगली किंमत देत नसे. या सर्वांची दखल घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या सिव्हिल रिस्पॉन्स टीमने घेतली आणि या टीमसोबत आशाताई कचरा वर्गीकरणासाठी प्रबोधन करतात. आज आशाताई स्वतः कचरा विकत घेतात आणि मोठ्या भंगार व्यापाऱ्याला विकतात. सीआरटीने वाळूज महानगरात सिडकोसोबत करार करून घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राटही मिळवले. 

चार लाखांची उलाढाल 
 कचऱ्यातून दोन वर्षांत चार लाखांची उलाढाल 
 कंपोस्ट खत तयार करून त्याची होते विक्री
 कचरा वर्गीकरणासाठी केले जाते प्रबोधन
 महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम

आताच्या पिढीने कचरा वेचला. माझ्या पुढच्या पिढीवर ही वेळ येऊ नये. उच्च शिक्षण घेऊन पुढची पिढी घडली पाहिजे. त्यासाठी कचरावेचकांना आज संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, चांगले आरोग्य देण्यासाठी मी धडपडत आहे.
- आशाताई डोके, उद्योजिका

आईने कचरा वेचून आमचे शिक्षण केले. आम्हाला वाढवले. फार गरिबीतून संघर्ष करत कचरा वेचकांपासून ते उद्योजिकापर्यंत खडतर प्रवास करत यश मिळविले आहे आणि आमचे देखील जीवनमान उंचावले.
- दत्ता डोके, पर्यवेक्षक

आम्ही कचरा वेचणाऱ्या आहोत म्हणून आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते; पण आज आशाताईंनी आमच्यासाठी जे काही केलं त्याने आमचे जीवनमान उंचावले. आता कुंडीत उतरून कचरा वेचण्याची गरज नाही.
- मालन साळवे, कचरावेचक

आज आम्ही कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देतो. त्यामुळे आम्हाला ओला, सुका कचरा वेगळा मिळतो. आरोग्यासाठी धोका नाही.
- सुमन नरवडे, कचरावेचक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT