तिथवली लसीकरण केंद्राचे कौतुक
तिथवली लसीकरण केंद्राचे कौतुक sakal
कोकण

तिथवली लसीकरण केंद्राचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने काल (ता. ७) तिथवली येथील कोविड लसीकरण केंद्राला भेट दिली. केंद्रावर नागरिकांसाठी केलेली बैठक व्यवस्था, परिसरातील स्वच्छता, पारदर्शक नोंदणी आणि लसीविषयी योग्य पद्धतीने दिली जात असलेली माहिती हे पाहिल्यानंतर आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी मुकेशकुमार जोशी यांनी या केंद्राचे आणि केंद्रावर काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

तिथवली केंद्रावर काल कोविड लसीकरण सुरू असतानाच अचानक जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी मुकेशकुमार जोशी, तालुका आरोग्य विभागाचे आनंदा जोशी हे तेथे हजर झाले. श्री. जोशी यांनी लसीकरण केंद्राची पाहणी केली. लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरण करण्यापूर्वी लसीविषयी माहिती दिली जात होती. याशिवाय नोंदणीची पध्दत देखील सुलभ होती. केंद्राचा संपूर्ण परिसर स्वच्छ होता. या सर्व गोष्टींचे निरीक्षक श्री. जोशी यांनी केले. नागरिकांकडूनदेखील त्यांना लसीकरण केंद्राविषयी चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. त्यामुळे श्री. जोशी यांनी टीमचे कौतुक केले. उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी किर्ती गायकवाड, निलिमा कुलकर्णी, जितेंद्र गौरखेडे या सर्वांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Speaker : भाजपचं टेन्शन वाढलं! लोकसभा अध्यक्ष पदासाठी चंद्राबाबू नायडूंची 'ही' अट; नितीश कुमारांची भूमिका काय?

UPSC Student: गुगल मॅपमुळे UPSC परिक्षेपासून वंचित! 3 मिनीटं उशिराने पोहचल्यानं प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

Pakistan T20WC 2024 : पाकिस्तानी खेळाडूंच्या खिशाला कात्री! वर्ल्ड कपमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर PCB ॲक्शन मोडमध्ये

Devidas Saudagar : आयुष्य जगण्याचे वास्तव खुणावत राहते;साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेले देविदास सौदागर यांच्याशी संवाद

Israel-Hamas War: ''मोदीच 'हे' करु शकतात, कारण ते ग्लोबल लिडर आहेत'', पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचं पत्र

SCROLL FOR NEXT