कोकण

चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच 

संदेश सप्रे

देवरूख - आगामी विधानसभेसाठी सेनेकडून विद्यमान आमदार सदानंद चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांची उमेदवारी निश्‍चित आहे. भाजपचा उमेदवार कोण याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. उमेदवारीसाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याने वरिष्ठांसमोर पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राष्ट्रवादीची जागा आता भाजपने घेतली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये गेल्या 3 वर्षात भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे विधानसभा भाजप स्वबळावर लढणार हे निश्‍चित आहे.

2014 ला झालेले मतदान 
1) सदानंद चव्हाण (शिवसेना) - 75695 
2) शेखर निकम (राष्ट्रवादी) - 69627 
3) माधव गवळी (भाजप) - 9143 
4) रश्‍मी कदम (कॉंग्रेस) - 3702 
5) गोपीनाथ झेपले (अपक्ष ) - 2720 
6) प्रेमदास गमरे - (बसपा) - 1592 

गतवेळी येथे नवखा उमेदवार असतानाही भाजपने लक्षणीय कामगिरी केली. यावेळी ती कसर भरून काढण्यासाठी तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे, गणेश चाचे आणि तुषार खेतल हे चार इच्छुक आहेत. चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचेही नाव चर्चेत आहे. वरकरणी लढाई तिरंगी वाटत असली तरी ती भाजपसाठी कॉंटे की टक्‍कर ठरणार आहे. त्यामुळेच येथील भाजपचा उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपमुळे येथील लढाई प्रतिष्ठेची होणार आहे. 

युतीत राहून सेनेला दे धक्‍का 
सध्या सर्व पक्ष स्वबळाची तयारी करीत असले, तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सेना-भाजपची युती झाली, तर भाजपची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विरोधाला विरोध म्हणून भाजपने युतीत राहून सेनेला दे धक्‍का करण्याचा प्रयत्न केला, तर येथील राजकारणात उलथापालथ होणार आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT