coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg 
कोकण

कोरोनाचे दिगशी हॉटस्पॉट 

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - दिगशी (वैभववाडी) गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या गावात आज कोरोनाचे आणखी 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून अजुनही अनेकांचे स्वॅबचा अहवाल यायचा आहे. दरम्यान, नावळे येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्‍यातील निम्या गावात कोरोनाचे रूग्ण आढळुन येत आल्यामुळे आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुक्‍यात 37 ठिकाणे कंटेन्टमेंट झोन करण्यात आली आहेत. 

तिथवलीतील दिगशी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. येथील बहुतांशी वाड्यांमध्ये तापसरीचे रूग्ण आढळुन येत होते; परंतु कुणीही कोरोनाची तपासणी केली नव्हती. संपुर्ण गावात साथ असल्यामुळे अखेर काही दिवसांपुर्वी तीन जणांची तातडीची तपासणी करण्यात आली. त्यातील दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आरोग्य प्रशासनाची चार, पाच पथके दिवस-रात्र या भागात सर्व्हेक्षण करीत असून संशयितांचे स्वॅब घेण्याचे काम करीत आहेत.

स्वॅब घेतलेल्या काहीचे अहवाल तालुका प्रशासनाकडे प्राप्त झाले. यामध्ये आणखी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात खळबळ माजली आहे. अजुनही कित्येकांचा स्वॅब अहवाल यायचा आहे. या गावातील रूग्णांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. दिगशीसह इतर गावांमध्ये देखील रूग्ण आढळत आहे.

तालुक्‍यातील उपळे, मांगवली, उंबर्डे, तिथवली, करूळ, नाधवडे, एडगाव, नापणे, कोकिसरे, सडुरे, नावळे, खांबाळे, नानीवडे, वैभववाडी, कुर्ली, कुसुर या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळुन येत असल्यामुळे परिस्थिती आरोग्य विभागाच्या नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात सध्या कोरोनाचे 106 रूग्ण सक्रीय आहेत. यातील सांगुळवाडी कोरोना सेंटरमध्ये 38, जिल्हा रूग्णालयात 17, गृहविलगीकरणात 46, खासगी रूग्णालयात दोन, कणकवली उपजिल्हा रूग्णालयात 1, जिल्हाबाहेर 2 अशा प्रकारे रूग्ण उपचार घेत आहे. 

प्रशासन हतबल 
तालुक्‍यातील निम्म्या गावात रूग्ण आढळत असल्यामुळे प्रशासन हतबल आहे. कोव्हीड सेंटर, 37 कंटेन्टमेंट झोन, बाधितांच्या ठिकाणी सर्व्हेक्षण, रेल्वेस्थानक, करूळ येथे तपासणीसाठी कर्मचारी, यामुळे आरोग्य विभागाकडे कर्मचाऱ्यांची वाणवा भासत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रशासन संकटापुढे हतबल होत आहे. लोकांकडुन अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे संसर्ग रोखण्यास विलंब होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT