coronavirus impact sindhudurg district
coronavirus impact sindhudurg district 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख 

-विनोद दळवी

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मार्चमध्ये एक आणि एप्रिलमध्ये एक, असे केवळ दोन रुग्ण मिळाले होते; मात्र 5 मे ते 31 मे या 27 दिवसांत तब्बल 54 रुग्ण आढळले आहेत. तर 1 जून रोजी 133 अहवालांपैकी 14 अहवाल पॉझझिटिव्ह आले आहेत. 16 मार्च ते 30 एप्रिल लॉकडाउन राहून कंटाळलेल्या चाकरमान्यांनी मेमध्ये जिल्ह्यात आपापल्या गावात धाव घेतली. परिणामी रेड झोन व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची संख्या वाढल्याने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढू लागली. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात ही संख्या सत्तरच्या जवळ पोहोचली आहे. 

ई-पासची खिरापत 
तिसरा टप्पा 1 मे रोजी जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गात काही प्रमाणात लॉकडाउनमध्ये शिथिलता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आणली. ई-पासची "खिरापत' मुंबई येथून सुरू झाली. त्याचा परिणाम मुंबई, पुणेसारख्या रेड झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येने जिल्ह्यात येण्यास झाला. या महिन्यात तब्बल 58 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे याच महिन्यांत मिळालेले 54 कोरोना रुग्ण हे याच चाकरमान्यांतील आहेत. सिंधुदुर्गात नियंत्रणात असलेल्या कोरोनाने मेमध्ये जोरदार मुसंडी मारत प्रशासनाने केलेल्या नियोजनावर व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादावर पाणी फिरले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित गावे 
* कणकवली : नडगिवे, ढालकाठी, डांबरे, शिवडाव, बावशी, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, पियाळी, वारगाव, बीडवाडी, कासार्डे, नाटळ, जानवली 
* कुडाळ : घोटगे, जांभवडे, नेरूर, पणदूर, कवठी 
* वेंगुर्ले - वायंगणी, मातोंड 
* देवगड : वाडा, कालवी-टेंबवली, नाद 
* मालवण : हिवाळे, सुकळवाड, हेदुळ 
* वैभववाडी : नाधवडे, तिरवडे, उंबर्डे, सडुरे 
* सावंतवाडी ः कारिवडे, बांदा, असनिये, माडखोल, डेगवे 
* दोडामार्ग : एकही नाही 

29 मेचा मोठा धक्का 
सिंधुदुर्गात पहिला रुग्ण 26 मार्चला मिळाला. दुसरा रुग्ण 35 दिवसांनी 29 एप्रिलला मिळाला. 5 मे रोजी तिसरा, 7 मे रोजी चौथा, 7 मेस पाचवा, 11 मे रोजी सहावा रुग्ण मिळाला. 14 मे रोजी तीन रुग्ण मिळाल्याने रुग्ण संख्या 9 झाली. 23 मे रोजी एकदम आठ रुग्ण मिळाले. त्यामुळे 17 रुग्ण झाले. 24 मे रोजी 1 रुग्ण मिळाल्याने 18 रुग्ण झाले. 28 मेस दिवसभरात सात व रात्री उशिरा 6 असे एकूण 13 रुग्ण मिळाले. त्यामुळे रुग्णसंख्या 31 झाली. तर 29 मे रोजी तब्बल 18 रुग्ण सापडले. 30 मे रोजी 5 रुग्ण सापडले. तर 31 मे रोजी 3 रुग्ण मिळाले. त्यामुळे ही संख्या थेट पन्नाशीच्या घरात 56 वर पोहोचली. 

अहवाल येण्याआधीच मृत्यू 
देवगड तालुक्‍यातील कालवी टेंबवली येथील 79 वर्षीय महिला 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला 20 रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याच दिवशी तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. उपचार सुरू असताना तिचा 23 रोजी मृत्यू झाला. 20 रोजी घेतलेल्या अहवालाचा रिपोर्ट 28 रोजी रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्‍वसनाचा आजार होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून "ती' कोरोनाची जिल्ह्यातील पहिला बळी ठरली आहे. 

कोरोनामुक्त रुग्ण 
*नडगिवे-1 
*घोटगे-1 
*जांभवडे-1 
*वायंगणी-1 
*नेरूर-1 
*वाडा-2 

26 मार्च ते 1 जून 
पर्यंत मिळाले 70 रुग्ण 

* 26 मार्च-1 
*29 एप्रिल-1 
*5 मे-1 
*7 मे-1 
*11 मे-1 
*14 मे-3 
*23 मे-8 
*24 मे-1 
*28 मे-13 
*29 मे-18 
*30 मे - 5 
*31 मे-3 
* 1 जून -14 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत रुग्ण तीव्र गतीने वाढत आहे. आता पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. या साथीच्या आजारात आढळणाऱ्या लक्षणात तापाचा समावेश होतो. त्यामुळे कोरोना तपासणी नमुने संख्या वाढणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब आवश्‍यक आहे. त्यामुळे मंजूर झालेली लॅब तत्काळ सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 
- उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT