uposhan
uposhan 
कोकण

संरक्षित कुळ बेकायदेशिररीत्या कमी केल्याप्रकरणी आमरण उपोषण

अमित गवळे

पाली- सुधागड तालुक्यातील वाफेघर येथील शेतकरी शंकर पांडू पवार यांनी आपल्या जमीन मिळकतीचे संरक्षण कुळ महसुल प्रशासनाने बेकायदेशीरित्या कमी केल्याचा आरोप केला आहे. सबंधीत प्रशासना विरोधात पवार पाली तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (ता.9) आमरण उपोषणास बसले आहेत.

उपोषणकर्ते पवार म्हणाले संरक्षीत कुळ बेकायदेशीरीत्या कमी करुन प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात संविधानिक व शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण सुरु केले आहे. या प्रकरणी जो पर्यंत योग्य न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरुच राहील असे त्यांनी सांगितले. याबाबत शंकर पवार यांनी प्रशासनस्तरावर व मंत्रालयस्तरावर देखील पत्रव्यवहार केला आहे. 

वाफेघर येथील मालकी जमीन मिळकतीवर बनावट, बेकायदेशीर कागदपत्रे तयार करुन सदर बेकायदेशीर कागदपत्रांच्या अनुषंगाने शासनाची दिशाभूल करुन सबंधीत महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी मनमानी शेरा दिला आहे. सदर जमीन त्रयस्त व्यक्तीस देवून आपल्याला भुमिहीन केले असल्याचे शंकर पवार यांनी म्हटले आहे. कौटुंबिक कुळ वारसा हक्काच्या जमीन मिळकतीत पांडू विठू पवार हे संरक्षण कुळ होते. परंतू सदर मिळकतीबाबत महाराष्ट्र महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कुळ नष्ट करुन जमीन एका बड्या उद्योगपतीच्या घशात घातली असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. 

सद्यस्थितीत या जमीनीवर एका बड्या भांडवलदाराचे बेकायदेशीररित्या नाव लावण्यात आले असून, याकामी महसूल प्रशासनाचे सबंधित तत्कालीन तलाठी, सर्कल आदिंचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शंकर पवार यांनी केला आहे. पाली तहसिलकार्यालयात या प्रकरणी न्याय मिळणेकामी वारंवार अर्ज विनंत्या करुन देखील प्रशासनाकडून सातत्याने वेळकाढूपणाची भुमिका घेतली जात आहे. प्रशासनामार्फत सहा महिन्यापासून केवळ आश्वासने दिली जात आहेत. याप्रकरणी बोलविण्यात येणार्‍या बैठकीत केवळ वेळकाढूपणा केला जातो. परंतु, समाधानकारक निर्णय होताना दिसत नाही. दरम्यान, कुळ नष्ट होणे बाबतचे कारण व पुरावा मागितला असता कोणताही पुरावा उपलब्द नसल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे यावेळी उपोषणकर्ते शंकर पवार यांनी सांगितले. न्याय देण्याच्या भुमिकेतून सबंधीत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही असे ते म्हणाले.

या उपोषणाला भा.रि.प बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेवून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क प्रमुख सेवक जाधव, सुधागड तालुकाध्यक्ष संदेश भालेराव यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी नारायण जाधव, प्रविण कृष्णा गायकवाड, नितीन उबाळे, राहूल गायकवाड, लक्ष्मण वाघमारे, तुषार शिर्के आदिंसह ग्रामस्त उपस्थीत होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT