A fine of Rs 14,000 was recovered during the day in dapoli ratnagir
A fine of Rs 14,000 was recovered during the day in dapoli ratnagir 
कोकण

दापोली शहरात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; दिवसभरात 14 हजार रुपयांचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली नगरपंचायतीकडून दापोली शहरात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली. काल14 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनाही मास्क न घातल्यामुळे 500 रुपये दंड भरावा लागल्याने दापोलीत चांगलीच खळबळ उडाली आहे. 


शासनाने मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. मात्र दापोली नगरपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर दापोली तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, अनेक होम क्‍वारंटाईन केलेले लोक दापोली शहरात फिरत असल्याने तसेच अनेकजण मास्क न घालता शहरात फिरत असल्याची माहिती एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना देत दापोली शहरात मास्क न घालणाऱ्यांवर अद्यापही नगरपंचायतीकडून कोणतीच दंडात्मक कारवाई करण्यात येत नसल्याचे सांगितले.

मास्क न घातल्यामुळे कारवाई; उपनगराध्यक्षही ​

त्याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी तत्काळ दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधून दापोली शहरात मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिल्यावर जागे झालेल्या दापोली नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाईला सुरवात केली. दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी साध्या वेशात शहरातील विविध ठिकाणी दंड वसुलीसाठी कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT