Harne Taluka Dapoli one more covid patient death total death count is 59 in ratnagiri 
कोकण

दापोलीत कोरोना बाधिताचा मृत्यू : मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 वर...

राजेश कळंबटे

रत्नागिरी : आज सकाळी प्राप्त माहितीनुसार हर्णे,  तालुका दापोली येथील एका 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी 7.45 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 झाली आहे.काल रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1746 झालेली आहे.

दरम्यान राजापूर शहरातील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वच्या सर्व २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शहरातील मापारीवाडा मोहल्ल्यातील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू होते. नंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान त्या मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आला असून सर्व निगेटिव्ह निघाले आहेत. तालुक्यात एकूण ६९ रुग्णांपैकी ५८ जण बरे होऊन घरी परतले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण सात जणांवर उपचार सुरू आहेत.

याचे विवरण खालीलप्रमाणे

 रत्नागिरी -      21
 कामथे    -       11
 कळंबणी   -    17
दापोली     -       3
रायपाटण    -     1
लांजा          -     1


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात पावसासाठी अजून प्रतीक्षा, हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जून 2026

ढिंग टांग : म्हारे हिवडा मां नाचे मोर..!

सोलापुरात घरगुती गॅसचा काळा बाजार! खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर घरगुती सिलिंडर; शहरातील नागरिकांना २५, ग्रामीणमध्ये ४५ दिवसांनी मिळते टाकी, वाचा...

Pune Firing : सहकारनगरमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार; एक व्यक्ती जखमी

SCROLL FOR NEXT