कोकण

‘एम-पोलिस ॲप’ने भाऊंच्या मक्तेदारीला चाप

राजेश शेळके

रत्नागिरी - पोलिस अधिकारी किंवा ड्युटी लावणाऱ्या ‘भाऊं’ची मर्जी सांभाळली तरच हवी त्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्यात येण्याची सोपी ड्युटी लागते. साहेबांच्या मर्जीतीलच कर्मचाऱ्यांना सुट्या किंवा हलकी कामे मिळतात. हे चित्र आता पालटणार आहे. गृह खात्याने ‘एम-पोलिस’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या, पगार स्लिप, ड्युटी वाटप, इतर सर्व अर्ज, पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्व प्रशासकीय काम एका क्‍लिकवर होणार आहे. 

राज्याच्या गृह खात्याने एम-पोलिस ॲप्लिकेशन विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये हे ॲप्लिकेशन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, औरंगाबाद, सोलापूर, पुणे ग्रामीणचा यामध्ये समावेश आहे. पोलिस दलामध्ये अजूनही ड्युटी लावणाऱ्या भाऊंना मोठे महत्त्व आहे. त्यांची मर्जी सांभाळली की आपल्याला सवलतीची ड्यूटी मिळणार याची कर्मचाऱ्यांना खात्री असते. मर्जीतील नसल्यास काहींना अक्षरशः पिचून काढले जाते, तशा तक्रारीही होतात. मात्र एम-पोलिस ॲपमुळे भाऊ किंवा वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याची गरज नाही. समान नोकरी करण्याची संधी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.   

...हे आहेत फायदे

* पोलिसांच्या वेळ, पैसा, श्रमाची बचत
* काम पेपरलेस, तत्काळ होणार
* मुख्यालयात फेऱ्याची गरज नाही. 

गृह खात्याने एम-पोलिस हे माबाईल ॲप विकसित केले आहे. त्याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी संबंधित टीम येऊन गेली. यामुळे दलातील प्रशासकीय कामामध्ये सुलभता आणि गतिमानता येणार आहे. सुरू होण्यास आणखी महिना लागेल.  
- डॉ. प्रवीण मुंढे,
पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

कसे असेल ॲप्लिकेशन
 प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा एक यूआयडी नंबर 
 नंबरवरून प्रत्येकजण लॉगिंन (ॲप्लिकेशन) करू शकणार 
 प्रशासकीय अर्ज किंवा काम यावर अपलोड करायचे
 अर्ज अपलोड केल्याचे संबंधिताला मोबाईलवर समजणार
 अर्जाचा स्टेटसही संबंधिताला कळणार आहे 
 अर्ज मंजूर किंवा नामंजूरची माहितीही यावर समजणार 
 नामंजूर केलेल्या अर्जाचे कारण यावर द्यावे लागणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT