Kotapur Will Be  Containment Zone Ratnagiri Marathi News
Kotapur Will Be Containment Zone Ratnagiri Marathi News  
कोकण

रत्नागिरी : कोतापूर होणार कंटेन्मेंट झोन 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) -  पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या लोकांच्या संर्पकात आलेल्या कोतापूर, ओणी-कोंडीवळे आणि प्रिंदावण येथील आणखीन तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचे तालुक्‍यात संक्रमण होत असल्याचे पुढे आले आहे. कोतापूर गावामध्ये पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केला असून तेथील परिसर कंटेन्मेंट झोन करण्याच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. 

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या कोतापूर गावाला तातडीने तहसिलदार प्रतिभा वराळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी तातडीने भेट देवून त्या परिसराची पाहणी केली. यावेळी लोकांशी संवाद साधताना कोरोनाला रोखण्यासाठी कसे रहावे, वागावे, सुरक्षितता कशी घ्यावी आदींबाबत माहिती दिली. त्यांच्यासमवेत कृषी विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. 

तालुक्‍यातील पाच गावांमधील चौदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यापूर्वी आढळले आहेत. बुधवारी (ता. 27) रात्री उशीरा आलेल्या स्वॅबच्या वैद्यकीय अहवालामध्ये तालुक्‍यात आणखीन तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये प्रिंदावण, ओणी-कोंडीवळे आणि कोतापूर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण यापूर्वी तालुक्‍यात आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबळे यांनी दिली.

प्रिंदावण आणि ओणी यापूर्वीच कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी योग्य खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात आहे. कोतापूरमध्ये सुमारे 168 घरे असून त्या ठिकाणी तातडीने आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करण्यासह अन्य खबरदारी घेण्यासाठी चार आरोग्य पथके नियुक्त केल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT