raigad
raigad 
कोकण

प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना अन्नदानाचा केला संकल्प

अमित गवळे

पाली : सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कुणाल पवार यांनी अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले. कुणाल यांनी सपत्नीक, आई व भावासोबत जळगाव येथील रेल्वे स्थानक, एस.टी स्टॅण्ड व मंदिराबाहेर बसणाऱ्या निराधार, गरीब व गरजू लोकांना अन्नदान व मिठाईचे वाटप करुन नववर्षाचे स्वागत केले.

नविन वर्षाचा पहिला दिवस म्हटंल की अनेक जण पार्टीचा बेत आखतात.देवदर्शनासाठी किंवा पर्यटनासाठी जाऊन नववर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करतात. मात्र कुणाल पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरिबांच्या तोंडी चार घास देवून नवा अादर्श घालुन दिला आहे. अन्न हे पूर्णब्रम्ह असते. पण गरीब परिस्थितीमुळे प्रत्येकालाच पुरेसे व चांगले अन्न मिळतेच अस नाही. ३१ डिंसेबरला वायफळ व अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गरीब व गरजू लोकांना अन्नदानाचा विचार कुणाल पवार यांच्या मनात आला.त्याप्रमाणे त्यांनी ३ पोळया,२ भाज्या, वरण-भात व मिठाई यांचा समावेश असलेले अन्नाच्या पाकिटांचे वाटप तीस गरीब व गरजूंना लोकांना स्वत:तेथे जाऊन केले.

कुणाल पवार यांनी वर्षभरापुर्वी आपल्या लग्नाच्या वेळी अनावश्यक खर्च,जुन्या रुढी-परंपरांना फाटा दिला होता. त्यावेळी त्यांनी सपत्नीक अवयवदानाचा संकल्प केला.एवढेच नव्हे तर अवयवदानासाठी जनजागृती करण्याकरिता प्रयत्नही सुरु केले आहेत. ऑक्टोबरमध्ये( २०१७) अापल्या जन्मदिनी रक्तदान करुन प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी रक्तदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस त्यांनी आदिवासी गरीब व गरजूं बांधवाना कपडे व खाऊ वाटप करुन साजरा केला. तसेच या वर्षापासून दरवर्षाच्या पहिल्या दिवशी अन्नदान करुन नववर्षाच्या स्वागताचा संकल्प केला आहे. कुणाल पवार यांनी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवशी आपल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे समाजोपयोगी कार्यात खारीचा वाटा उचलला अाहे. कुणाल पवार यांनी वेळोवेळी राबविलेले हे उपक्रम समाजासाठी नवा आदर्श निर्माण करणारे व प्रेरणादायी ठरले आहेत.

स्वत:साठी सर्वजण जगतात पण जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. हि आईची शिकवण माझ्या प्रत्येक उपक्रमासाठी मला प्रेरणादायी ठरते. अवयवदान, रक्तदान, वस्त्रदान असो की अन्नदान या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन ही चळवळ अजून दृढ़ व व्यापक बनावयास हवी.सामान्य परिस्थितीमुळे अजून काही जास्त मदत करु शकत नाही याची मला खंत वाटते. परंतू माझ्या परिने मी जेवढे होईल तेवढे समाजकार्य करतच राहणार आहे.
- कुणाल पवार, प्राथमिक शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT