Marathi News_Kokan_Senior social activist Gafoor Maniyar
Marathi News_Kokan_Senior social activist Gafoor Maniyar 
कोकण

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूर मनियार यांच्या कार्याचा गौरव

अमित गवळे

पाली (जि. रायगड) - पालीतील सामाजिक कार्यकर्ते गफूर महम्मुद मनियार यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल रायगड जिल्हा मुस्लिम वेलफेअर ऑर्गनायजेशन (फलाही तन्जीम) यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृह खोपोली येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक आणि जागतिक किर्तीचे नामवंत उद्योजक हासन चौंगले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या पंधरा समाजसेवकांचा सत्कार या कार्यक्रमात केला गेला. गफूर मनियार यांनी मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी अमुल्य योगदान दिले आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात त्यांचा हिरीरिने सहभाग असतो. त्यांनी आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास खतिबे कोकण अली एम. शम्सी यांच्या भाषणाने सुरुवात झाली. भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष हाजी जावेद पाशा कुरेशी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुस्लिम समाजबांधवांनी आपल्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि तरुणांना उच्चशिक्षित बनण्याचे आवाहन केले. 

यावेळी प्रख्यात उद्योजक व समाजसुधारक सनाउल्ला अ. रहेमान, ठाणे जिप माजी अध्यक्ष इरफान महम्मद हुसेन भुरे, बदलापूर नगरसेवक मसूद अब्दुल सत्तार कोहारी, खोपोली नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष द्त्ताजी मसूरकर आदींसह पालीतील तन्जीमचे सर्व पदाधिकारी बशिरभाई परबळकर, आब्बासभाई बेणसेकर, सुलतानभाई पठाण, सुलतान बेणसेकर, युसुफभाई पठाण, अकबरभाई पानसरे, मनसूर पानसरे, हानिफ अत्तार, तालिबभाई शेख, अरिफ मनियार, आदिंसह मुस्लीम व बहुजन समाज बांधव उपस्थित होते. हा कार्यक्रम मुस्तफा हाजी अहम्मद पौजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात अली अब्दुल्ला कौचाली, हाजी आय्यब, एफ. एम. तांबोळी, डॉ. अरिफ एम. युसुफ दाखवे, आस्लम सईद नाईक, मा. मुख्तार आय. वेळास्कर, अब्दुलगनी एजी सरफरे, हमजाखान एम. आवेसकर, इस्माईल दाउत पल्लवकर, अॅड. इस्माईल मौलिम घोले, आल्लारखा सोरटीया, फरजंद अली रोगे, अमानुल्ला इब्राईम बर्डे, शौकत हासन तार्लेकर या रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठीत व प्रतिभासंपन्न मान्यवरांचा मुस्लिम समाजाच्या प्रगतीस योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाचे आयोजन अतिक युसुफ खोत, जाफर खान ए. देशमुख, रशिद उमर फहीम, अब्दूल रहेमान आय हाजिते, इस्माईल बाबुलाल मुलानी, सरफराज ए. के. तिवले, निजामुद्दीन ए. जळगावकर व सर्व तन्जीम पदाधिकारी व सदस्य खालापूर तालुका यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायगड जिल्हा मुस्लीम वेलफेअर ऑर्गनायजेशन (फलाही तन्जीम) समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT