Pre-monsoon works meeting sawantwadi konkan sindhudurg
Pre-monsoon works meeting sawantwadi konkan sindhudurg 
कोकण

मॉन्सूनपूर्व कामांचा सावंतवाडीत आढावा 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग|) - पावसाळी संकटाचा सामना करण्यासाठी पालिकेने शीघ्र गतीने नियोजन सुरू केले आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक आणि खासगी विहिरी, गाळ उपसा व स्वच्छतेबरोबर गटारांची साफसफाई आणि डास निर्मुलनाचे नियोजन करण्यात आले. याबाबतची तातडीची बैठक आज नगराध्यक्ष कक्षामध्ये पार पडली. 

नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये येत्या आठ दिवसांमध्ये पावसाळापूर्व सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस आरोग्य व क्रीडा सभापती ऍड परीमल नाईक, पालिका कार्यालय अधीक्षक आसावरी केळबाईकर, नगरसेवक मनोज नाईक, स्वच्छता विभागाचे विनोद सावंत आदी उपस्थित होते. 

सावंतवाडीत 19 सार्वजनिक विहिरींची साफसफाई करण्याच्या कामाचा प्रारंभ नगराध्यक्ष परब यांच्या हस्ते केला जाणार असून शहरातील सर्व तसेच खाजगी विहिरींचीही साफसफाई पालिकेच्या वतीने करण्यत येणार आहे. तसे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. विहिरीचा गाळ उपसा, साफसफाई बरोबर नालेसफाईच्या कामासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

विहिरीतील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याबरोबर प्लास्टिक आच्छादनासाठीही सूचनाही देण्यात आल्या. मुख्य म्हणजे सावंतवाडी पालिकेच्या कार्यालयीन इमारतीचे वॉटरप्रूफिंग तात्काळ करून घ्या किंवा प्लास्टिकने आच्छादन करा, अशाही सूचना त्यानी दिल्या. वॉटरप्रूफिंगचे काम ठेकेदाराला देण्यात आले असून येत्या एक-दोन दिवसांत ते पूर्ण होईल, अशी माहिती आसावरी केळबाईकर यांनी दिली. 

भाजी मंडईबाबत सूचना 
संत गाडगेबाबा भाजी मंडईतील छताची डागडुजी तत्काळ करण्याच्या सूचना नगराध्यक्ष परब यांनी दिल्या. या बैठकीत मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. सध्या शहरांमध्ये पावसाळी कामांचा निपटारा करण्यासाठी पुरेसा कर्मचाऱ्यांची संख्या तपासून कामगार काम करतात की नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य व क्रीडा सभापती नाईक यांनी दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT