पावस - "शाळा नाही पण शिक्षण सुरू' हे या शैक्षणिक वर्षाचं वैशिष्ट्य आहे. काहींचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले. बारावीचे वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांची गरज लक्षात घेऊन बारावी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी "ओंजळ' ऍप तयार केले आहे. बारावी मराठी भाषा पाठ्यपुस्तक अभ्यासगटातील सदस्यांनी साकारले आहे. यामध्ये पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरमधील प्रा. शीतल सामंत यांचाही समावेश आहे.
अभ्यासगटातील डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद, सुचेता नलावडे, रेणू तारे आणि आरती देशपांडे यांनी स्वयंस्फूर्त प्रयत्नांतून साकारली आहे. "ओंजळ' ऍपचे वेगळेपण म्हणजे यात पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते प्रत्येक पाठ्यघटकांवर विवेचन, पीपीटी, कृती आणि दृक्-श्राव्य चित्रफीत (व्हिडिओ) दिसणार आहेत. काही व्हिडिओंची निर्मिती सदस्यांनी केली आहे, तर काही व्हिडिओ त्या, त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आपली एक "ओंजळ' भेट म्हणून दिली आहे. एखाद्या पाठाचा अथवा घटकाचा विचार कसा करावा आणि तो स्वतःच्या भाषेत अभिव्यक्त कसा करावा, हे यातून समजेल, अशी निश्चित खात्री वाटते, असे शीतल सामंत यांनी सांगितले. सदरचे ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
डहाके, इंगोले, बनसोडे..
पाठ्यपुस्तकातील कवी वसंत आबाजी डहाके, लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले व हिरा बनसोडे यांनी या ऍपसाठी टिपणे लिहिली आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि पीडीएफ डाऊनलोड करून ऑफलाईन स्वरूपात वापरता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.