Rajapur ST Agar esakal
कोकण

Wedding Ceremony : वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी 'लालपरी'ला सर्वाधिक पसंती; दीडशे गाड्या आरक्षित, 20 लाखांचं उत्पन्न

गेल्या काही महिन्यांपासून लग्नसराईची (Wedding Ceremony) धामधूम सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

एसटी गाड्यांची संख्या कमी असताना स्थानिक नियमित गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करताना आगार व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून लग्नसराईची (Wedding Ceremony) धामधूम सुरू असून, वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी यजमानांकडून एसटीला प्राधान्य दिलं जात आहे. लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी येथील राजापूर एसटी आगारातून आतापर्यंत सुमारे दीडशे गाड्या आरक्षित झाल्या असून, त्यातून सुमारे २० लाखांचे उत्पन्न आगाराला मिळाले आहे.

एसटी गाड्यांची संख्या कमी असताना स्थानिक नियमित गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करताना आगार व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीतही नियमित फेन्यांसह लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी आगार व्यवस्थापक आहे.

शुभांगी पाटील यांनी पर्यवेक्षक कर्मचारी, यांत्रिक कर्मचारी चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली यजमानांच्या मागणीप्रमाणे गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यासाठी त्यांनी योग्य पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे वऱ्हाडींना गाड्या उपलब्ध होताना आगारालाही चांगलेच उत्पन्न मिळत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त असून, मे महिन्यामध्ये त्याच्या तुलनेमध्ये जास्त मुहूर्त आहेत. त्यामुळे एसटी गाड्यांची जादा मागणी लक्षात घेऊन आगारप्रमुख पाटील यांनी सहकाऱ्यांच्या साथीने गाड्या उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने योग्य पद्धतीने नियोजन केले होते. त्यामध्ये नियमित फेऱ्यांचे नियोजन कोलमडणार नाही याकडेही कटाक्षाने लक्ष देण्यात आले होते.

या साऱ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आजपर्यंत दीडशे गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. आगाराला सुमारे २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये तालुका आणि जिल्ह्यामध्ये वऱ्हाडींची वाहतूक करण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देताना सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यासह मुंबई, बोरिवली आदी भागामध्येही वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी एसटी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाख; मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; समोर आली धक्कादायक माहिती

Property Tax : कर सवलतीची आजच संधी; मिळकतकर थकबाकीदारांवर उद्यापासून जप्तीची कारवाई

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Vat Purnima Heart Attack Death : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजला वटवृक्ष; वाण देतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, सिंधुदुर्गातील 'या' सावित्रीचा दुर्दैवी अंत

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

SCROLL FOR NEXT