Water Tanker
Water Tanker esakal
कोकण

रत्नागिरी : टँकर धावताहेत तहानलेल्या गावांत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: संगमेश्‍वरमधील एक आणि मंडणगडमधील तीन धरणांतील साठा दुरुस्तीसाठी सोडून देण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे ३९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये भर पडली. सध्या ६४ गावांतील ११७ वाड्यांना १० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. १८ हजार ७६६ लोकांना टँकरचा आधार आहे.

यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असली तरीही अजून उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावलेली असून विहिरी, तळी या पाण्याच्या स्रोतांमध्ये खडखडाट आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाईत वाढ होत आहे. पाणी मिळत नसल्याने टँकरचा आधार ग्रामस्थांकडून घेतला जात आहे. ही परिस्थिती उद्भवलेली असतानाच पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीसाठी काही धरणातील पाणीसाठा कमी करण्यात येत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील उमरे येथील पाणी सोडण्यात आले आहे तर मंडणगड तालुक्यातील भोळवली, चिंचाळ, पणदेरी या क्षेत्रातील पाणी कमी झाल्यामुळे त्यावर आधारित नळयोजनांचे पाणी बंद झाले आहे. ऐन उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

यंदा जलजीवन मिशनमुळे टंचाई आराखड्यात मोठी घट झाली होती; परंतु मानवनिर्मिती कारणांमुळे टंचाईग्रस्त वाड्यांची आकडेवारी वाढली आहे.गतवर्षी याच कालावधीत ६४ गावांतील १०६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवले जात होते. यंदा ११७ वाड्यांना टँकरचा आधार आहे. आतापर्यंत ६१५ टँकरच्या फेऱ्‍या झाल्या असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

त्या वृत्ताला अधिकाऱ्‍यांचा दुजोरा

उमरेतील एका धरणावर ११ वाड्या तर मंडणगडमधील तीन धरणांवर २८ वाड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून होता. धरणातील पाणी कमी झाल्याच्या वृत्ताला जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी दुजोरा दिला आहे. तेथील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी टँकरने पाणी सुरू केले आहे. तशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून केली होती.

तालुका गाव वाडी लोकं

मंडणगड १२ ३४ ७०९९

दापोली २ ६ १३५४

खेड १२ १६ १४७०

चिपळूण १८ २६ २४४२

संगमेश्‍वर १४ २४ ४४७५

रत्नागिरी १ ५ १३७३

लांजा ५ ६ ५५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT