Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Priyanka Chopra Beauty Tips: तुम्हालाही प्रियंका चोप्रासारखी चमकदार त्वचा हवी असेल तर घरीच बॉडी स्क्रब बनवू शकता.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSakal

Priyanka Chopra Beauty Tips: देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. लोक घराबाहेर जाताना चेहरा बांधून जातात. पण त्याचाही चेहऱ्यावर काही फायदा होत नाही. चेहाऱ्यावर टॅनिंग दिसू लागते. त्वचेवरचे टॅनिंग काढण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. बाजारात देखील महागडे उत्पादने मिळतात. पण त्याचा जास्त दिवस फरक टिकून राहत नाही उलट त्वचा जास्त खराब होते.

देसी गर्ल प्रियंका चोप्रा सोशल मिडियावर अनेक ब्युटी टिप्स आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेअर करत असते. टॅनिंग कमी करण्यासाठी प्रियंकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लिंबाचा वापर केला आहे. लिंबामुळे त्वचा उजळ होते. पण लिंबाचा वापर थेट चेहऱ्यासाठी करू नका. तुम्ही फेस मास्कमध्ये मिक्स करून लावू शकता. त्वचेवरचे टॅनिंग कमी करण्यासाठी बॉड स्क्रब कसा बनवतात हे जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

१ कप बेसण

२ चमचे दही

अर्धा चिरलेला लिंबू

गरजेनुसार दूध

एक चमचा चंदन पावडर

चिमुटभर हळद

Priyanka Chopra
World Milk Day 2024: आरोग्यासह चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त आहे दूध, 'असा' बनवा कच्च्या दुधाचा फेस पॅक

कसे वापरावे

एका भांड्यात बेसण आणि दही चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात लिंबू आणि दूध टाकावे. चंदन पावडर आणि हळद टाकून चांगली पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हाता-पायावर लावावी. १० मिनिटानंतर हलक्या हाताने चोळावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोनदा करू शकता. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com