rice plant issue konkan Sindhudurg
rice plant issue konkan Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात 55 हजार क्विंटल भात खरेदी पूर्ण 

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग)- खरीप हंगामातील भात खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आतापर्यंत 55 हजार क्विंटल ऑनलाईन भात खरेदी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 8 कोटी 74 लाख एक हजार 796 रोख जमा झाल्याने दिलासा मिळाला आहे. यंदा 60 ते 70 हजार क्विंटल भात खरेदी होईल, अशी अपेक्षा असून जवळपास 32 केंद्रावर सध्या ऑनलाईन भात खरेदी सुरू आहे; मात्र शासनाने जिल्ह्यातील एक राईस मिलला ठेका दिल्याने भातखरेदीला विलंब होत आहे. यासाठी राईस मिलची निकोप स्पर्धा असायला हवी. "भरडाई' झाली असली तरी शासनाने तांदुळ खरेदी केलेले नाहीत. 

जिल्ह्यात यंदा विक्रमी भात उत्पादन झाले. जवळपास 74 हजार हेक्‍टर क्षेत्रात खरीप भात लागवड झाली होती. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा अनेक नैसर्गिक संकटातून शेतकरी जात असताना कोरोना, लॉकडाउनचाही मोठा प्रभाव भातशेती उत्पादनावर पडला होता; मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाताला सरकारनेही यंदा चांगला दर दिला आहे. शासकीय भात खरेदी केंद्रावर 2568 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. यंदा 1868 इतका भाताला हमीभाव असून 700 रुपये बोनसही दिला जात आहे. जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघ आणि गाव पातळीवर भात खरेदी केंद्र सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा 49 भात केंद्रांना परवानगी दिली; पण केवळ 35 केंद्रावर ही भात खरेदी झाली. काही केंद्रावर अजूनही खरेदी सुरू आहे. यंदा 31 मार्चपर्यंत भात खरेदी सुरू राहणार आहे. 

गोडाऊन प्रश्‍न गंभीर 
भातखरेदीला प्रतिसाद मिळत असला तरी निवडलेल्या केंद्रांना गोडाऊनचा प्रश्‍न गंभीर आहे. शेती संस्थांची आर्थिक स्थिती फारच नाजूक आहे. खरेदी विक्री संघांच्या केंद्रांना अन्य धान्ये किंवा खते, बियाणे आणि त्यांच्या विविध विक्रीच्या वस्तू यामुळे गोडाऊनमध्ये भात ठेवणे अडचणीचे ठरत आहे. शेती संस्थांना धान्यसाठा करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने धोरणात्म निर्णय घेवून धान्यसाठी करण्यासाठी आर्थिक तरतूद किंवा तालुकास्तरावर गोडाऊन निर्माण करण्याची गरज आहे. 

दृष्टीक्षेपात

* तांदुळ विक्री रखडली 
* 31 मार्चपर्यंत भातखेरीदी 
* 60 हजार क्विटल भातखरेदी अपेक्षा 
* भातपिकपाणीसाठी तलाठी दाखल 
* 1868 भाताला हमीभाव 
* खेरीपच्या खरेदीवर 700 रूपये बोनस 
* गतवर्षी 35 हजार क्विंटल खरेदी  

 संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT