Sawantwadi Mayor's Press Conference on the Project
Sawantwadi Mayor's Press Conference on the Project 
कोकण

सावंतवाडीवासीयांना नगराध्यक्षांनी दिलीय गुड न्यूज..काय आहे ती? वाचा

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या अडीच एकर व कचरा प्रकल्पाच्या पंचवीस गुंठे जागेत अशा दोन ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून शंभर कोटींचा नवा प्रोजेक्‍ट उभारण्यात येणार आहे. याठिकाणी भाजी मार्केटसाठी आलेले पाच कोटी रुपये कोरोनामुळे परत गेल्याने व भविष्यात ते मिळणे कठीण असल्याने हा निर्णय घेतला आहे. वर्षभरात हा प्रोजेक्‍ट सुरू होणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. 

नगराध्यक्ष परब यांनी पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक आनंद नेवगी, निशांत तोरस्कर, केतन आजगावकर, अमित परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष म्हणाले, ""मुंबई, पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीने हे दोन्ही प्रकल्प होणार असून त्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांचे सहकार्य तसेच मुंबईतील एक चांगला आर्किटेक देण्याची हमी दिली आहे.

दोन्ही प्रकल्प होत असताना सध्या त्याठिकाणी जे स्थानिक व्यापारी व विक्रेते आहेत त्यांची योग्य व्यवस्था करणार आहोत. सर्वांना विश्‍वासात घेऊन व न दुखवता हा प्रोजेक्‍ट उभा केला जाणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्‍ट शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत. कोरोना कालावधी संपताच शहरात अग्निशमन प्रकल्पाचे भूमिपूजनही होणार आहे.'' 

परब पुढे म्हणाले, ""शहरातील अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांसाठी आलेले 11 कोटी रुपये परत गेले आहेत. यासाठी उपोषणही केले. पैसे परत मिळावे यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे. लवकरच बायोगॅस प्रकल्पासोबत अंडरग्रॉऊड गॅस प्रकल्पही शहरात सुरू करणार आहोत. 

नागरिकांनी घाबरू नये 
परब म्हणाले, ""सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सापडलेला रुग्ण हा खरा कोरोना योद्धा असून त्याच्या कार्याला सलाम. तो लवकरच बरा होऊन पुन्हा कामावर रुजू होईल. शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला म्हणून नागरिकांनी घाबरुन नये. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी त्वरित उर्वरित कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून परिसरही सॅनिटाईज केला आहे. प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही श्री. परब म्हणाले. 

गणेशोत्सव नियोजन 
गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता पालिकेकडून नियोजन केले असुन नारायण मंदिरपासून ते रामेश्‍वर प्लाझापर्यंत फुटपाथवर ग्रामीण भागातून येणाऱ्या विक्रेत्यांची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7.30 पर्यंत हा बाजार चालणार आहे. त्यानंतर स्वच्छतेसाठी वेळ असून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता बाजार सुरू होणार आहे. गणेशोत्सवात 11 दिवसांसाठी हे नियोजन राहणार आहे. या काळात शहरातील बाजारपेठेतील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. एसटी वाहतूक राजवाड्यामार्गे सुरू राहील.  

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT