Shradha Shivdavkar Selected As Lieutenant In Army
Shradha Shivdavkar Selected As Lieutenant In Army  
कोकण

तळेरेच्या श्रध्दा शिवडावकरची सैन्यात लेफ्टनंटपदी निवड 

सकाळवृत्तसेवा

तळेरे ( सिंधुदुर्ग ) - मूळ करुळ येथील आणि तळेरे गावाची श्रध्दा शिवडावकर हिची सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाली. येथील ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्यावतीने तीचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. याचे आयोजन तिचे मामा वायंगणकर कुटुंबीयांनी केले होते. 

यावेळी श्रध्दा शिवडावकर, सरपंच साक्षी सुर्वे, सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच दीपक नांदलसकर, माजी सरपंच शशांक तळेकर, डॉ. प्रकाश बावधनकर, सुधीर तळेकर, विलास शिवडावकर, रजनी शिवडावकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्रध्दा म्हणाली, ""आर्मीमध्ये जायचे प्रथमच ठरविलेले होते. याला घरच्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. घरात मिळालेले चांगले संस्कार आणि त्यासाठी मला मिळालेला पाठिंबा यामुळे लेफ्टनंट पदापर्यंत हा प्रवास झाला.'' 

यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, व्यापारी संघटना, बाजारपेठ मित्र मंडळ, (स्व.) सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, पत्रकार संघ, भाई पोकळे, सुनील इस्वलकर आणि वायंगणकर कुटुंबिय यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी रजनी शिवडावकर, विलास शिवडावकर, साक्षी सुर्वे, शशांक तळेकर, दिलीप तळेकर, डॉ. प्रकाश बावधनकर यांनी मनोगत व्यक्त केले. याला बापू वायंगणकर, राजू वायंगणकर, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सचिव विनय पावसकर, व्यापारी संघटना अध्यक्ष राजू पिसे, बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष उल्हास कल्याणकर, विश्वजीत तळेकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोज तळेकर, शरद वायंगणकर आदी उपस्थित होते. आभार प्रविण वरुणकर यांनी मानले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT