Crime News esakal
कोकण

Sindhudurg Crime : घरातील पंख्याला ओढणी बांधून विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहून ठेवली चिठ्ठी

सकाळ डिजिटल टीम

तिने लिहिलेली चिठ्ठी असंख्य पानांची आहे. त्यात अन्य काही बाबी नोंद असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

ओरोस : येथील भवानी मंदिर परिसरातील सुवर्ण कलश बिल्डिंगमध्ये तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. भाग्यश्री अनंत तांबे (वय २४) असे तिचे नाव आहे.

अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी व्यक्त केला. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली असून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही पुणे येथे शिक्षण घेत होती. तीन महिन्यांपूर्वी ती घरी आली होती. आज सकाळी आई तिच्या खोलीचा दरवाजा उघडायला गेली. त्यावेळी भाग्यश्रीने प्रतिसाद दिला नाही.

शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता भाग्यश्री खोलीतील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. दरम्यान, तिने लिहिलेली चिठ्ठी असंख्य पानांची आहे. त्यात अन्य काही बाबी नोंद असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. अधिक तपास कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT