Sanjay Gaikwad Car Accident
Sanjay Gaikwad Car Accident Esakal
कोकण

Sanjay Kadam Car Accident : मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांच्या कारला भीषण अपघात; अनर्थ टळला

अंकिता खाणे (Ankita Khane)

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई कुर्ला मार्गावर संजय कदम यांच्या कारला आयशरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा मधून संजय कदम प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी वाटेत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संजय कदम यांच्यासह कारमधील अन्य व्यक्ती सुखरूप आहेत.

भाजपचे माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्या कारला भीषण अपघात

भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्या गाडीचा काही दिवसांपुर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात परिणय फुके सुदैवाने थोडक्यात बचावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT