कोकण

सावंतवाडीत ‘वन-वे’चा विचार

CD

75479
सावंतवाडी ः रिक्षा, सीटर चालकांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे.

सावंतवाडीत ‘वन-वे’चा विचार

मेंगडे ः पार्किंग समस्येवर लवकरच बैठक घेऊ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः शहरात पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी वन-वे मार्ग सुरू करण्यासंदर्भात तसेच पार्किंग नियोजनासंदर्भात नागरिक, पालिका प्रशासन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच रिक्षा, मोटार चालक आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केले. वाहन चालकांनी वाहने चालविताना स्वतःसह प्रवाशी तसेच ग्राहकांची काळजी घेणे गरजेचे आहे, वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन त्यांनी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत सावंतवाडी येथे रिक्षा, टेम्पो, सीटर तसेच मोटार चालक व वाहकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शहरात रॅली काढून अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी सतर्कता बाळगावी, असा संदेश दिला. या अभियानाचे उद्‍घाटन पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेंगडे म्हणाले, "सावंतवाडी शहरात पार्किंगची समस्या मोठी आहे. चुकीच्या पध्दतीने वाहने उभी केली जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. तसेच वन-वे सुरू करण्यात यावा, अशीही नागरीकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच सावंतवाडीतील पत्रकारांशी चर्चा करण्यात आली असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व वाहनधारकांकडुन सहकार्य होणे अपेक्षित आहे." वाहतूक पोलिस राजा राणे, सुनील नाईक आदींनी उपस्थित वाहनधारकांचे आभार मानले. यावेळी रिक्षा, सीटर, टेम्पो चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT