कोकण

मावळंगेतील धोकादायक विजेचे खांब अखेर बदलले

CD

rat२८२.txt

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat२८p६.jpg ः
७८६८८
मावळंगे (ता. रत्नागिरी) ः मावळंगे धनगरवाडी परिसरामध्ये सिमेंटचे विद्युतखांब नव्याने बसवण्यात आले. (छायाचित्र ः अनिल बिर्जे, मावळंगे)
--

मावळंगेतील विद्युत खांब बदलले

पावस, ता. २८ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे-धनगरवाडी येथील लोखंडी विद्युतखांब गंजल्याने धोकादायक बनले होते. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर धोकादायक चार विद्युतखांब नव्याने बसवण्यात आले. त्याबद्दल धनगरवाडी परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मावळंगे धनगरवाडी कातळावर वसलेली आहे. येथील विद्युत खांब मोडकळीस आले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल बिर्जे यांनी वारंवार संबंधित वीजकंपनीला पत्रव्यवहार केला होता; परंतु त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. अखेर त्याबाबत संबंधित शाखा अभियंतांना प्रत्यक्ष भेटून पाहणी करण्याचे सांगण्यात आल्यानंतर परिस्थितीची पाहणी केली. वस्तुस्थिती व अनिल बिर्जे यांचा पत्रव्यवहार याची दखल घेऊन अखेर विद्युत कंपनीने जीर्णावस्थेत असलेले लोखंडी खांब बदलून त्या ठिकाणी चार सिमेंट खाब बसवण्यात आले. त्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT