कोकण

क्राईम पट्टा

CD

rat३०४१. txt

( पान ३ साठी)

मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला अटक

रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-मराठवाडी येथील चंडिका देवी मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातून ९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी संशयित चोरट्याला जयगड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तुषार सुभाष पाटील (वय ३५, भाटलेवाडी-मालगुंड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलिसांनी सांगितले, की हा प्रकार सोमवारी (ता.२३) ते २९ जानेवारी सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आला होता. संशयिताने मराठवाडी मालगुंड येथे चंडिका देवी मंदिरातील दानपेटीमध्ये पैसे टाकण्याची फट कोणत्यातरी धारदार हत्याराच्या साहाय्याने रूंद करून दानपेटीतील ९ हजार २०० रुपयांची नाणी व नोटा चोरून नेल्या या प्रकरणी मंदिर अध्यक्ष जितेंद्र जयवंत साळवी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास जयगड पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास रविवारी (ता. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली.
--------
मद्यपी ट्रकचालकावर गुन्हा

रत्नागिरी ः हातखंबा ते बावनदी राष्ट्रीय महामार्गावर मद्य प्राशन करून ट्रक चालवणाऱ्या चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी सुदाम रावळ (वय ३२, रा. पाटकुळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे संशयित मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास हातखंबा ते बावनदी रस्त्यावर निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मोहन पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
-------
मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोशन रवींद्र आंबेकर (वय २७, रा. फणसवळे, कोंडवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २९) सकाळी साडेअकरा सुमारास मिरजोळे पाटीलवाडी येथील नदीकिनारी जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार भगवान पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--------
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या महिलेस जीवदान

रत्नागिरी ः कोल्हापूर येथून श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या महिला स्नानासाठी समुद्राच्या पाण्यात उतरल्या. प्रियांका बालाजी सपाटे (३०, मंगळवारपेठ, कोल्हापूर) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २९) दुपारी एकच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपाटे या देवदर्शनानंतर समुद्र स्नानासाठी समुद्राच्या पाण्यात उतरल्या होत्या; मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. या वेळी जवळच असणारे त्यांची पती बालाजी सपाटे यांनी ओरडा सुरू केला. त्या वेळी येथील जीवरक्षक, पोलिस व मोरया वॉटरस्पोर्टच्या स्वयंसेवकांनी तत्काळ समुद्रात धाव घेतली आणि प्रियांका यांना तत्काळ पाण्याबाहेर काढले. त्यांना संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करून सायंकाळी सोडून देण्यात आले व सपाटे कुटुंबीय कोल्हापूरकडे रवाना झाले. या महिलेला वाचवण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत जीवरक्षक गणपतीपुळे पोलिसचौकीचे पोलिस नाईक प्रशांत लोहारकर, पोलिस शिपाई सागर गिरी गोसावी, मोरया वॉटरस्पोर्ट यांनी विशेष मेहनत घेतली.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT