कोकण

आंब्रडमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

CD

79716
आंब्रड ः वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज आदी.


आंब्रडमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

विविध कार्यक्रम उत्साहात; हनुमान वाचनालय, ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम

कुडाळ, ता. १ ः श्री हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आंब्रडतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थी, ग्रामस्थांना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यामध्ये सर्वप्रथम वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, हळदीकुंकू समारंभ यांचा समावेश होता. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन बाजारवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी वेर्लेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संतसेवा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कीर्तनकार सीताराम परब, प्रकाश कदम, अरविंद पांगम, ज्ञानेश्वर मुंज, किरण पारकर, रश्मी कसालकर, नयना हरमलकर, भक्ती चव्हाण, जान्हवी मसूरकर आदी उपस्थित होते. त्यानंतर सीताराम परब यांना अखिल सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय मंडळाचा मानाचा संतसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाह प्रवीण भोगटे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. गौरी वेर्लेकर यांनी मनोगतात वाचनालयाच्या प्रगतीची प्रशंसा करून वाचनाची आवड विद्यार्थ्यांना सुजाण, गुणवान नागरिक घडवेल, असे सांगितले. आंब्रड हायस्कूलच्या नयना हरमलकर यांनी आनंद यादव यांच्या ‘झोंबी’ या कादंबरीचे विवेचन करून वाचनाने जीवन सुखमय करा, असे आवाहन केले. परब यांनी सत्काराबाबत वाचनालयाचे ऋण व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेचा निकाल असा ः प्राथमिक गट- प्राची सावंत, चैतन्य परब, चैतन्य चव्हाण. उच्च प्राथमिक गट-मेघा दळवी, लावण्य कदम, दिशा दळवी. माध्यमिक गट-मृण्मयी भोगटे, दिव्या राऊळ, समृद्धी मसूरकर. बक्षीस वितरण कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, ग्रामपंचायत सदस्या गौरी दळवी, माजी ग्रामपंचायत सदस्या गंगाबाई तेली, मनीषा तेली, मानिनी काणेकर, पांडुरंग दळवी, शशिकांत तेली, प्रवीण भोगटे आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. हळदीकुंकू समारंभाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाच्या छाया दळवी, विनंती कदम, पूजा परब यांनी मेहनत घेतली. वाचनालयाचे सदस्य किरण पारकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT