कोकण

गाबीत समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी उपरकर

CD

गाबीत समाजाच्या
जिल्हाध्यक्षपदी उपरकर

मालवणमध्ये कार्यकारिणीची निवड

मालवण, ता. १४ : सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज कार्यकारिणी अध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर महेंद्र पराडकर यांची सरचिटणीसपदी, बाबा मोंडकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत येथील धुरीवाडा संस्कार हॉल येथे विशेष सभा झाली. यावेळी निवडलेली उर्वरित कार्यकारिणी अशी-उपाध्यक्ष संजय पराडकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, खजिनदार सहदेव बापर्डेकर, सहसचिव धर्माजी आडकर, किरण कुबल, हिशेब तपासणीस दीपक तारी, जिल्हा संघटक रवीकिरण तोरसकर, स्नेहा केरकर, सदस्य-राजन गिरप, हरी खोबरेकर, मेघनाद धुरी, बाबी जोगी, रमेश तारी, अन्वय प्रभू, जयंत मोंडकर, सेजल परब, श्वेता हुले, उषःकला केळुसकर. जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून समाज बांधवांच्या सर्वागीण उत्कर्षासाठी कार्यरत असताना पक्षीय राजकारणाला थारा न देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. निवडणुकांच्या काळात समाज संघटनेचा पक्षीय पाठिंब्याबाबत पत्रकबाजी न करण्याचे बैठकीत निश्चित केले. एप्रिल अखेरीस दांडी समुद्र किनारी आयोजित केलेल्या गाबीत महोत्सवाची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने उपरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राधिका कुबल, दीक्षा ढोके, दिलीप घारे, छोटू सावजी, मिथुन मालंडकर, दादा वाघ, रश्मीन रोगे, भगवान मसूरकर, किरण तोरसकर, संजय बांदेकर, लक्ष्मण तारी, सुहास पराडकर, अरविंद मोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष म्हणून राजन गिरप यांनी केलेल्या कार्याचा विशेष गौरव झाला. गिरप यांनी वेंगुर्ले गाबित समाज तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT