कोकण

राजापूर-जिल्ह्यातील 18 विद्यार्थी, दोन शिक्षक जाणार इस्त्रोला

CD

-rat२०p३.jpg ःOP२३L८४००५ स्विंजल जाधल
-rat२०p४.jpg ःKOP२३L८४००६ जस्लिन हाजू
------------
अठरा विद्यार्थी, दोन शिक्षक जाणार इस्त्रोला
राजापुरातील दोघांचा समावेश ; चौथा, पाचवा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना संधी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासह जिज्ञासूवृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेने राबवलेल्या या उपक्रमातर्गंत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी नुकतीच इस्रो आणि नासाची सफर केली होती. आता जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो, त्रिवेंद्रम भेट देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील दोन याप्रमाणे जिल्ह्यातील १८ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची निवड झाली आहे. त्यामध्ये तालुक्यातील चिखलगाव येथील स्विंजल जाधव आणि खरवते येथील जस्लिन हाजू या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पुढील महिन्यामध्ये हे विद्यार्थी भेट देणार असून, या अभ्यासदौर्‍याच्या माध्यमातून निवड झालेले विद्यार्थी आणि शिक्षकांना वैज्ञानिक माहिती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेने नुकताच नासा आणि इस्रो भेटीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला होता. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदने राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गंत राज्याबाहेर अभ्यासदौऱ्याला मंजुरी दिल्याने जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या राज्याबाहेर अभ्यासदौर्‍याचे आयोजन केले आहे.
नासा आणि इस्रो उपक्रमासाठी घेतलेल्या परीक्षेतील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासाची सफर करण्याची संधी मिळाली नव्हती. राज्याबाहेर म्हणजे इस्रो (त्रिवेंद्रम) येथे काढण्यात येणार्‍या अभ्यासदौर्‍यासाठी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. या दौर्‍यासाठी जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. चिखलगाव येथील शाळेची विद्यार्थिनी स्विंजल ही २०२०-२१ यावर्षीची, तर खरवते शाळेची जस्लीन २०२१-२२ ची शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ताधारक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT