कोकण

कुडाळ, वेंगुर्लेत शनिवारपासून शास्त्रीय, सुगम संगीत मैफल

CD

84547
डॉ. प्रवीण गावकर, उर्वी फडके


कुडाळ, वेंगुर्लेत शनिवारपासून
शास्त्रीय, सुगम संगीत मैफल

वेंगुर्ले, ता. २२ ः गोव्यातील स्वस्तिक संस्थेच्या संजीवन संगीत अकादमीतर्फे वेंगुर्ले व कुडाळ येथे शास्त्रीय व सुगम संगीत कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. शनिवारी (ता. २५) वेंगुर्ले येथे मधुसुदन कालेलकर सभागृहात सायंकाळी सहाला, तर रविवारी (ता. २६) श्री देव कुडाळेश्वर मंदिरात सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होणार आहे.
लोकप्रिय पार्श्वगायक पं. सुरेश वाडकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झालेल्या पणजी येथील संजीवन संगीत अकादमीत शास्त्रीय गायन, सारंगी वादन, संवादिनी वादन व तबला वादनाचे शिक्षण गेली पाच वर्षे दिले जात आहे. या अकादमीतून बरेच कलाकार तयार होत असून स्वतंत्र गायन व वादनाचे कार्यक्रम करत आहेत. या अकादमीत ‘सारंगी’ या दुर्मिळ वाद्याचे खास वर्ग सुरू केले असून त्यासाठी ग्वाल्हेर येथून पूर्ण वेळ सारंगी शिक्षक नेमले आहेत. गोमंतकीय प्रसिद्ध गायक डॉ. प्रवीण गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अकादमीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमात डॉ. गावकर यांचे शास्त्रीय गायन, वसीम खान यांचे सारंगी वादन व पल्लवी पाटील, उर्वी फडके, आरती गावडे व डॉ. गावकर यांचे भक्तिगीत, भावगीत सादरीकरण होणार आहे. त्यांना संगीत साथ तबला उत्पल सायनेकर, संवादिनी मालू गावकर, पखावज मनीष तांबोसकर व टाळ कृष्णा परब करणार आहेत. दोन्ही कार्यक्रमांचे निवेदन अनुक्रमे मानसी वाळवे व नेहा उपाध्ये करणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे अभिजात संगीत व संजीवन संगीत अकादमीच्या कार्याचा प्रसार जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT