कोकण

तिलारी घाटात दोन वाहनांना अपघात

CD

88697
तिलारी ः घाटात दरीत कोसळलेली अपघातग्रस्त वाहने.


अवघड वळणाने केला घात

तिलारी घाटात दोन अपघात; वाहने दरीत, सर्वजण सुखरुप

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ ः तिलारी घाटात जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर एकाच दिवशी दोन अपघात झाले. दोन्ही वाहने संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळली. सुदैवाने वाहनातील चालकसहित अन्य प्रवासी सुखरूप आहेत. हे दोन्ही अपघात काल (ता.११) दुपारी काही वेळाच्या फरकाने घडले. एक मालवाहतूक तर दुसरी पुण्यातील पर्यटकांच्या मोटारीचा समावेश आहे.
तिलारी घाटातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेळगावहून गोव्याला माल वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो पिकअप तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर अपघात घडला. तीव्र उतार व नागमोडी वळण असल्याने चालकाला अंदाज आला नाही. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी संरक्षक कठडा तोडून थेट दरीत कोसळली. पहिल्या अपघातानंतर काही वेळातच पुणे येथून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या मोटारीला त्याच जागी अपघात झाला. नवखा चालक असल्याने तिव्र उताराच्या घाटाचा त्याला अंदाज आला नाही. पहिल्या गाडीला अपघात झाला होता त्याच जयकर पॉईंटवर पुण्यातून आलेल्या पर्यटकांच्या मोटारीला अपघात झाला. मोटार थेट दरीत कोसळली; मात्र, खाली असलेल्या अपघातग्रस्त बोलेरो पिकअपवर ही मोटार अडकली. त्यामुळे अनर्थ टळला. अपघातग्रस्त दोन्हीं गाड्यांमधील चालकासह प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली; परंतु, मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT